S M L

पवनकुमार बंसल यांचा राजीनामा सादर

04 मेनवी दिल्ली : रेल्वे बढतीत भाच्याच्या लाचखोरीप्रकरणी रेल्वेमंत्री पवनकुमार बंसल यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी दुपारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. आणि राजीनामा देऊ केला. पण सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान हा राजीनामा स्वीकारणार नसल्याचं समजतंय. काँग्रेसच्या कोअर ग्रुपची आज संध्याकाळी बैठक होणार आहे. त्यात राजीनाम्याच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री पवनकुमार बंसल यांचा भाचा विजय सिंघला याला लाचखोरीप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी रात्री चंदीगडमध्ये अटक केली. विजय सिंघला रेल्वे बोर्डाचे सदस्य महेशकुमार यांच्याकडून बढतीसाठी 90 लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महेशकुमार यांच्याकडून ही रक्कम पोचवणार्‍या कुरिअरच्या दोन तरुणांनाही अटक करण्यात आली आहेत. या अटकेमुळे रेल्वेतल्या बढतीतलं मोठं रॅकेट उघड झालंय. विजय सिंघला पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक होते. रेल्वे बोर्डावर बढतीसाठी सिंघला यांना लाच दिल्याची कबुली महेशकुमार यांनी चौकशीदरम्यान दिली. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना सहा दिवसांची ट्रांझिट कोठडी देण्यात आली आहे. सीबीआयने संदीप गोयल नावाच्या आणखी एका व्यक्तीला अटक केलीय. ही डील फिक्स केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यावर आता विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत बंसल यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2013 09:41 AM IST

पवनकुमार बंसल यांचा राजीनामा सादर

04 मे

नवी दिल्ली : रेल्वे बढतीत भाच्याच्या लाचखोरीप्रकरणी रेल्वेमंत्री पवनकुमार बंसल यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी दुपारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. आणि राजीनामा देऊ केला. पण सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान हा राजीनामा स्वीकारणार नसल्याचं समजतंय. काँग्रेसच्या कोअर ग्रुपची आज संध्याकाळी बैठक होणार आहे. त्यात राजीनाम्याच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

रेल्वेमंत्री पवनकुमार बंसल यांचा भाचा विजय सिंघला याला लाचखोरीप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी रात्री चंदीगडमध्ये अटक केली. विजय सिंघला रेल्वे बोर्डाचे सदस्य महेशकुमार यांच्याकडून बढतीसाठी 90 लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महेशकुमार यांच्याकडून ही रक्कम पोचवणार्‍या कुरिअरच्या दोन तरुणांनाही अटक करण्यात आली आहेत. या अटकेमुळे रेल्वेतल्या बढतीतलं मोठं रॅकेट उघड झालंय.

विजय सिंघला पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक होते. रेल्वे बोर्डावर बढतीसाठी सिंघला यांना लाच दिल्याची कबुली महेशकुमार यांनी चौकशीदरम्यान दिली. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना सहा दिवसांची ट्रांझिट कोठडी देण्यात आली आहे.

सीबीआयने संदीप गोयल नावाच्या आणखी एका व्यक्तीला अटक केलीय. ही डील फिक्स केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यावर आता विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत बंसल यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2013 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close