S M L

साता-यात महिलांनी दारू विक्रेत्याची धिंड काढली

2 जानेवारी 2009 सातारासातारा जिल्ह्यातल्या येणके गावात दारूबंदी व्हावी म्हणून संतप्त महिलांनी एका दारू विक्रेत्याची गावातून धिंड काढली आणि त्याला चप्पलांचा हार घातला. तसंच त्याच्याकडून पकडलेली दारू रस्त्यावर ओतून दिली. या प्रकारानंतर तिथे पोलीस आले आणि त्यांनी दारू विक्रेत्याला ताब्यात घेतलं. येणके गावातील महिलांनी गावात दारूबंदी व्हावी म्हणून 31 डिसेंबरपासून हल्लाबोल आंदोलन सुरू केलं आहे.याबाबत माहिती अशी की, येणके गावात दारू विक्रेता छुप्या पद्धतीनं दारू विकण्यासाठी आला होता.त्यावर महिलांनी छापा टाकून त्याच्याकडच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. एवढ्यावर न थांबता त्यांनी त्याची गावातून धिंड काढली आणि गावातील चौकात आणलं. त्यानंतर महिलांनी त्याला चप्पलांचा हार घातला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2009 11:04 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2009 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close