S M L

मृत कामगार दाखवून 'रोहयो'चे पैसे लुटले

07 मेजालना : दुष्काळी किंवा अस्मानी संकटात आधार देणारी म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेकडे पाहिलं जातं. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यात तर वृद्ध आणि चक्क मृत लोक कामावर असल्याचं दाखवून त्यांच्या नावानं रोजगार हमी योजनेची बिलं उचलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहेत. जालन्यात सध्या रोजगार हमी योजनेअंतर्गत भरपूर कामं दिली जात आहेत. पण तालुक्यातल्या 80 किंवा अगदी 90 वर्षांच्या वृध्दांच्या आणि काही वेळेस अगदी मृत व्यक्तीही रोजगारावर असल्याचं दाखवून त्यांच्या नावानं बिलं घशात घातली जात आहेत. ज्या वृध्द लोकांच्या नावानं ही बिलं घेतली जात आहे. त्यांना याची कल्पनादेखील नाही. यामागे संबंधित अधिकार्‍यापासून, रोजगाराचे पैसे जमा होणार्‍या बँका ते राजकारण्यांपर्यंत अशी साखळी असल्याचा आरोप होतोय. इतकंच नाही तर गावच्या महिला सरपंचानांही याबद्दल अंधारात ठेवलं जातंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2013 11:07 AM IST

मृत कामगार दाखवून 'रोहयो'चे पैसे लुटले

07 मे

जालना : दुष्काळी किंवा अस्मानी संकटात आधार देणारी म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेकडे पाहिलं जातं. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यात तर वृद्ध आणि चक्क मृत लोक कामावर असल्याचं दाखवून त्यांच्या नावानं रोजगार हमी योजनेची बिलं उचलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहेत.

जालन्यात सध्या रोजगार हमी योजनेअंतर्गत भरपूर कामं दिली जात आहेत. पण तालुक्यातल्या 80 किंवा अगदी 90 वर्षांच्या वृध्दांच्या आणि काही वेळेस अगदी मृत व्यक्तीही रोजगारावर असल्याचं दाखवून त्यांच्या नावानं बिलं घशात घातली जात आहेत. ज्या वृध्द लोकांच्या नावानं ही बिलं घेतली जात आहे.

त्यांना याची कल्पनादेखील नाही. यामागे संबंधित अधिकार्‍यापासून, रोजगाराचे पैसे जमा होणार्‍या बँका ते राजकारण्यांपर्यंत अशी साखळी असल्याचा आरोप होतोय. इतकंच नाही तर गावच्या महिला सरपंचानांही याबद्दल अंधारात ठेवलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2013 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close