S M L

संसदेत आजही गदारोळ कायम

07 मेनवी दिल्ली : मागिल आठवड्यापासून संसदेत सुरू असलेला गदारोळ आजही कायम आहे. संसदेच्या कामकाजात आजही अडथळे आले. 1 वाजता लोकसभेचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केला. विरोधी पक्ष पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणीवर ठाम आहेत. याआधी 12 वाजता कामकाज सुरू होताच, दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी, विशेषतः भाजपच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर कामकाज 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेले अश्वनीकुमार आणि पवनकुमार बन्सल यांचे राजीनामे मिळत नाहीत तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा निर्णय भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत सकाळीच घेण्यात आला होता. यूपीएसाठी महत्त्वाचं असलेलं अन्न सुरक्षा विधेयक संसदेत मांडण्यात आलंय. मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांनी राजीनामे दिल्याशिवाय सरकारला विधेयक मंजूर करण्यात मदत करणार नाही असं भाजपनं स्पष्ट केलंय. डाव्या पक्षांनी मात्र अन्न सुरक्षा विधेयकाला सहकार्य करणार असल्याची भूमिका घेतली आहे. जमीन अधिग्रहण विधेयकही संसदेत प्रलंबित आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2013 11:52 AM IST

संसदेत आजही गदारोळ कायम

07 मे

नवी दिल्ली : मागिल आठवड्यापासून संसदेत सुरू असलेला गदारोळ आजही कायम आहे. संसदेच्या कामकाजात आजही अडथळे आले. 1 वाजता लोकसभेचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केला. विरोधी पक्ष पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणीवर ठाम आहेत.

याआधी 12 वाजता कामकाज सुरू होताच, दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी, विशेषतः भाजपच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर कामकाज 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेले अश्वनीकुमार आणि पवनकुमार बन्सल यांचे राजीनामे मिळत नाहीत तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा निर्णय भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत सकाळीच घेण्यात आला होता.

यूपीएसाठी महत्त्वाचं असलेलं अन्न सुरक्षा विधेयक संसदेत मांडण्यात आलंय. मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांनी राजीनामे दिल्याशिवाय सरकारला विधेयक मंजूर करण्यात मदत करणार नाही असं भाजपनं स्पष्ट केलंय. डाव्या पक्षांनी मात्र अन्न सुरक्षा विधेयकाला सहकार्य करणार असल्याची भूमिका घेतली आहे. जमीन अधिग्रहण विधेयकही संसदेत प्रलंबित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2013 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close