S M L

ठाण्यात इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

07 मेठाण्यातल्या धोकादायक असलेल्या मालकी हक्काच्या आणि गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टाने याला हिरवा झेंडा दाखवला आहे. 1999 साली ठाण्यात असलेल्या 1974 पूर्वीच्या धोकादायक इमारतींना तीन एफएसआय देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो मालकी हक्काच्या आणि गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींना मात्र लागू करण्यात आला नव्हता. याविरोधात ठाण्याच्या एका विकासकाने मुंबई हायकोर्टात 2002 मध्ये आव्हान दिलं होतं. दोन वर्षांनी विकासकाच्या बाजूनं निकाल आल्यानं त्याविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयामुळे आता ठाण्यातल्या सुमारे 400 धोकादायक इमारतींना 3 एफएसआय मिळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2013 01:34 PM IST

ठाण्यात इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

07 मे

ठाण्यातल्या धोकादायक असलेल्या मालकी हक्काच्या आणि गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टाने याला हिरवा झेंडा दाखवला आहे. 1999 साली ठाण्यात असलेल्या 1974 पूर्वीच्या धोकादायक इमारतींना तीन एफएसआय देण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र तो मालकी हक्काच्या आणि गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींना मात्र लागू करण्यात आला नव्हता. याविरोधात ठाण्याच्या एका विकासकाने मुंबई हायकोर्टात 2002 मध्ये आव्हान दिलं होतं. दोन वर्षांनी विकासकाच्या बाजूनं निकाल आल्यानं त्याविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयामुळे आता ठाण्यातल्या सुमारे 400 धोकादायक इमारतींना 3 एफएसआय मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2013 01:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close