S M L

या विजयाचं श्रेय राहुल गांधींना -पंतप्रधान

08 मेकर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेल्या विजयाचे संपूर्ण श्रेय हे राहुल गांधी यांना जाते अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली. भाजपच्या भ्रष्टाचाराला जनतेनी स्पष्टपणे नाकारलं असं सांगत त्यांनी कर्नाटकाच्या विजयाबद्दल विजय उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्यात. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवलीय. या विजयावर काँग्रेसच्या नेत्यांनी आपली मतं व्यक्त केली. भाजपने जनतेला गृहीत धरले, जनतेची दिशाभूल केली म्हणून त्यांचा पराभव झाला अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. तर कर्नाटकची निवडणूक ही प्रत्येक पक्षाला इशारा आहे. जनतेची काम केली नाही तर जनता तुम्हाला खुर्चीवरून खाली उतरवते हे यावरून सिद्ध झाले अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी दिली. तर दुसरीकडे या पराभवामुळे भाजपला हादरा बसला आहे. आजच्या निकालात भाजप थेट तिसर्‍या क्रमांकावर फेकली गेली आहे. पक्षातील अंतर्गत वादामुळे पक्षाचा पराभव झाला अशी कबुली खुद्द भाजपचे नेते देत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 03:27 PM IST

या विजयाचं श्रेय राहुल गांधींना -पंतप्रधान

08 मे

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेल्या विजयाचे संपूर्ण श्रेय हे राहुल गांधी यांना जाते अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली. भाजपच्या भ्रष्टाचाराला जनतेनी स्पष्टपणे नाकारलं असं सांगत त्यांनी कर्नाटकाच्या विजयाबद्दल विजय उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्यात.

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवलीय. या विजयावर काँग्रेसच्या नेत्यांनी आपली मतं व्यक्त केली. भाजपने जनतेला गृहीत धरले, जनतेची दिशाभूल केली म्हणून त्यांचा पराभव झाला अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. तर कर्नाटकची निवडणूक ही प्रत्येक पक्षाला इशारा आहे.

जनतेची काम केली नाही तर जनता तुम्हाला खुर्चीवरून खाली उतरवते हे यावरून सिद्ध झाले अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी दिली. तर दुसरीकडे या पराभवामुळे भाजपला हादरा बसला आहे. आजच्या निकालात भाजप थेट तिसर्‍या क्रमांकावर फेकली गेली आहे. पक्षातील अंतर्गत वादामुळे पक्षाचा पराभव झाला अशी कबुली खुद्द भाजपचे नेते देत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2013 08:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close