S M L

सीबीआय म्हणजे बोलका पोपट : सुप्रीम कोर्ट

08 मेनवी दिल्ली : सीबीआय म्हणजे सरकारचा बोलका पोपट आहे. ज्याप्रमाणे मालकाच्या इशार्‍यावर पोपट बोलतो तशी अवस्था सीबीआय या संस्थेची झाली आहे अशा कडक शब्दात सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केली आहे. सीबीआयचं काम हे चौकशी करणे आहे, सरकारशी संवाद साधणं नाही. सीबीआयची विश्वासार्हता कमी होत आहे ही दु:खाची बाब आहे. जर सीबीआयला स्वातंत्र्य दिलं नाही तर आम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल असंही कोर्टाने नमूद केलं. तसंच कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्रावर सुनावणी दरम्यान ऍटर्नी जनरल आणि ऍडिशनल सॉलिसिटर जनरलना कोर्टानं कडक शब्दांत फटकारलं. कोळसा खाण वाटप प्रकरणी सीबीआयने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. या 9 पानी प्रतिज्ञापत्रात पंतप्रधान कार्यालय, कोळसा मंत्रालय आणि कायदा मंत्रालय तसंच ऍटर्नी जनरल यांच्याकडे थेट बोट दाखवण्यात आलं आहे.कोळसा खाण वाटप घोटाळ्याचा सीबीआयचा चौकशी अहवाल पंतप्रधान कार्यालयातले अधिकारी आणि कायदा मंत्र्यांनी पाहिला होता आणि त्यामध्ये बदल केले होते असं सीबीआयच्या या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या बैठकांना ऍटर्नी जनरलही उपस्थित होते असं सीबीआयनं मान्य केलंय. यावरून गेली दोन दिवस संसदेत गदारोळ झाला. विरोधकांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज बंद पाडलं.कोर्टाने काय म्हटलं ? 'सीबीआय मालकाची वाणी बोलणारा पिंजर्‍यातला बोलका पोपट बनलंय. सरकारचं प्रशासकीय नियंत्रण असलेल्या पोलीस दलासारखी सीबीआयची परिस्थिती झालीय. सीबीआयला संपूर्ण स्वायत्ता दिली नाही तर कोर्टाला हस्तक्षेप करावा लागेल. पंतप्रधान कार्यालयाचे सहसचिव आणि कोळसा मंत्रालय बैठकीला येतात, अहवाल बघतात आणि बदल सुचवतात, हे होऊच कसं शकतं. सरकारी अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून अहवालाचा गाभाच बदलण्यात आलाय. कोळसा घोटाळ्याच्या तपासात काहीच प्रगती झालेली नाही. सीबीआयची विश्वासार्हता ढासळत असल्याचं बघून दु:ख होतं. सीबीआयचं काम हे तपास करणं आहे. सरकारशी सल्लामसलत करणं नाही. सीबीआयला सरकारचा दबाव झुकारून काम करता यायला हवं.' वहानवटी यांनी त्यांच्याविरोधात लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत'मी सीबीआयकडून अहवालाची कोणतीही प्रत मागवली नाही. मी केवळ कायदा मंत्र्यांच्या सूचनेनुसारच काम केलं. मी कायदा मंत्र्यांच्या सूचनेसुसारच सीबीआयच्या अधिकार्‍यांना भेटलो'

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2013 10:09 AM IST

सीबीआय म्हणजे बोलका पोपट : सुप्रीम कोर्ट

08 मे

नवी दिल्ली : सीबीआय म्हणजे सरकारचा बोलका पोपट आहे. ज्याप्रमाणे मालकाच्या इशार्‍यावर पोपट बोलतो तशी अवस्था सीबीआय या संस्थेची झाली आहे अशा कडक शब्दात सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केली आहे. सीबीआयचं काम हे चौकशी करणे आहे, सरकारशी संवाद साधणं नाही. सीबीआयची विश्वासार्हता कमी होत आहे ही दु:खाची बाब आहे. जर सीबीआयला स्वातंत्र्य दिलं नाही तर आम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल असंही कोर्टाने नमूद केलं. तसंच कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्रावर सुनावणी दरम्यान ऍटर्नी जनरल आणि ऍडिशनल सॉलिसिटर जनरलना कोर्टानं कडक शब्दांत फटकारलं.

कोळसा खाण वाटप प्रकरणी सीबीआयने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. या 9 पानी प्रतिज्ञापत्रात पंतप्रधान कार्यालय, कोळसा मंत्रालय आणि कायदा मंत्रालय तसंच ऍटर्नी जनरल यांच्याकडे थेट बोट दाखवण्यात आलं आहे.

कोळसा खाण वाटप घोटाळ्याचा सीबीआयचा चौकशी अहवाल पंतप्रधान कार्यालयातले अधिकारी आणि कायदा मंत्र्यांनी पाहिला होता आणि त्यामध्ये बदल केले होते असं सीबीआयच्या या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या बैठकांना ऍटर्नी जनरलही उपस्थित होते असं सीबीआयनं मान्य केलंय. यावरून गेली दोन दिवस संसदेत गदारोळ झाला. विरोधकांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज बंद पाडलं.

कोर्टाने काय म्हटलं ?

'सीबीआय मालकाची वाणी बोलणारा पिंजर्‍यातला बोलका पोपट बनलंय. सरकारचं प्रशासकीय नियंत्रण असलेल्या पोलीस दलासारखी सीबीआयची परिस्थिती झालीय. सीबीआयला संपूर्ण स्वायत्ता दिली नाही तर कोर्टाला हस्तक्षेप करावा लागेल. पंतप्रधान कार्यालयाचे सहसचिव आणि कोळसा मंत्रालय बैठकीला येतात, अहवाल बघतात आणि बदल सुचवतात, हे होऊच कसं शकतं. सरकारी अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून अहवालाचा गाभाच बदलण्यात आलाय. कोळसा घोटाळ्याच्या तपासात काहीच प्रगती झालेली नाही. सीबीआयची विश्वासार्हता ढासळत असल्याचं बघून दु:ख होतं. सीबीआयचं काम हे तपास करणं आहे. सरकारशी सल्लामसलत करणं नाही. सीबीआयला सरकारचा दबाव झुकारून काम करता यायला हवं.' वहानवटी यांनी त्यांच्याविरोधात लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत

'मी सीबीआयकडून अहवालाची कोणतीही प्रत मागवली नाही. मी केवळ कायदा मंत्र्यांच्या सूचनेनुसारच काम केलं. मी कायदा मंत्र्यांच्या सूचनेसुसारच सीबीआयच्या अधिकार्‍यांना भेटलो'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2013 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close