S M L

LBT बाबत सरकारने त्वरीत निर्णय घ्यावा -शरद पवार

09 मेमुंबई : एलबीटीच्या मुद्द्यावरून एकीकडे व्यापार्‍यांचं आंदोलन सुरू असताना आता याच विषयावर राजकारण सुरू झालंय. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी एलबीटी बाबत सरकारनं त्वरित निर्णय घ्यावा, असं आवाहन केलंय. दीर्घकाळ बाजारपेठ बंद राहणं योग्य नाही असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला. ते सातार्‍यात बोलत होते. तर एलबीटीचा तिढा सुटण्यासाठी व्यापारी आणि राज्य सरकारनं एक पाऊल मागे घ्यावं असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. त्याच वेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज एलबीटीला विरोध करत राज्यपालांची भेट घेतली. मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. भाजपने यापूर्वीच पुण्यात एलबीटीला विरोध केलाय. त्यामुळे या विषयावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एकाकी पडलेत, असं दिसतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2013 09:57 AM IST

LBT बाबत सरकारने त्वरीत निर्णय घ्यावा -शरद पवार

09 मे

मुंबई : एलबीटीच्या मुद्द्यावरून एकीकडे व्यापार्‍यांचं आंदोलन सुरू असताना आता याच विषयावर राजकारण सुरू झालंय. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी एलबीटी बाबत सरकारनं त्वरित निर्णय घ्यावा, असं आवाहन केलंय. दीर्घकाळ बाजारपेठ बंद राहणं योग्य नाही असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला. ते सातार्‍यात बोलत होते.

तर एलबीटीचा तिढा सुटण्यासाठी व्यापारी आणि राज्य सरकारनं एक पाऊल मागे घ्यावं असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. त्याच वेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज एलबीटीला विरोध करत राज्यपालांची भेट घेतली. मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. भाजपने यापूर्वीच पुण्यात एलबीटीला विरोध केलाय. त्यामुळे या विषयावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एकाकी पडलेत, असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2013 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close