S M L

गिलानींच्या मुलाचे प्रचारसभेतून अपहरण

09 मे मुलतान : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या मुलगा अली हैदरचं अपहरण करण्यात आलंय. पाकमधील मुलतानमध्ये ही घटना घडली. गिलानीचा मुलगा हैदर एका प्रचारसभेत सहभागी झाले होते. यासभेत त्यांचे भाषण होणार होते. पण त्याचवेळी अज्ञात बंदुकधार्‍यांनी गोळीबार करत हैदर यांना ताब्यात घेऊन पसारा झाले. या गोळीबारात गिलानींचे सचिव आणि अंगरक्षकाचा मृत्यू झाला. या अपहरणाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलतानमध्ये गिलानींच्या मुलाने सभा घेऊ नये अशा धमक्या गिलानींना मिळाल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने गिलानींना निवडणूक लढवण्यास मनाई केली. त्यामुळे त्यांचे तिन्ही मुलं अब्दुल, अली मुसा आणि अली हैदर गिलानी निवडणूक लढवत आहे. येत्या शनिवारी मतदान होणार आहे. आज गुरूवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. निवडणुकांच्या घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 110 लोकांचा मृत्यू झालाय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2013 11:42 AM IST

गिलानींच्या मुलाचे प्रचारसभेतून अपहरण

09 मे

मुलतान : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या मुलगा अली हैदरचं अपहरण करण्यात आलंय. पाकमधील मुलतानमध्ये ही घटना घडली. गिलानीचा मुलगा हैदर एका प्रचारसभेत सहभागी झाले होते. यासभेत त्यांचे भाषण होणार होते. पण त्याचवेळी अज्ञात बंदुकधार्‍यांनी गोळीबार करत हैदर यांना ताब्यात घेऊन पसारा झाले.

या गोळीबारात गिलानींचे सचिव आणि अंगरक्षकाचा मृत्यू झाला. या अपहरणाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलतानमध्ये गिलानींच्या मुलाने सभा घेऊ नये अशा धमक्या गिलानींना मिळाल्या होत्या.

सुप्रीम कोर्टाने गिलानींना निवडणूक लढवण्यास मनाई केली. त्यामुळे त्यांचे तिन्ही मुलं अब्दुल, अली मुसा आणि अली हैदर गिलानी निवडणूक लढवत आहे. येत्या शनिवारी मतदान होणार आहे. आज गुरूवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. निवडणुकांच्या घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 110 लोकांचा मृत्यू झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2013 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close