S M L

लातूरमध्ये ST बसमध्ये स्फोट

10 मेलातूर : येथील चाकूर तालुक्यात नळेगाव एसटी स्टँडमध्ये एका एसटी बसमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात 10 ते 15 लोक जखमी झालेत. जखमींना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. उदगीरहून लातूरकडे निघालेली ही बस नळेगाव स्टँडमध्ये थांबली होती. सातच्या सुमारास हा स्फोट झाला. मात्र हा स्फोट कशामुळे झाला याबद्दल अधिकृत माहिती कळू शकली नाही. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार नळेगाव स्टँडमध्ये ही बस थांबलेली होती आणि अचानक हा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती आजूबाजूच्या इमारतींना हादरा बसलाय. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले. हा स्फोट इंजिन गरम झाल्यामुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त होतोय पण इंजिनचा स्फोट इतक्या मोठ्या प्रमाणावर असू शकत नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2013 02:21 PM IST

लातूरमध्ये ST बसमध्ये स्फोट

10 मे

लातूर : येथील चाकूर तालुक्यात नळेगाव एसटी स्टँडमध्ये एका एसटी बसमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात 10 ते 15 लोक जखमी झालेत. जखमींना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. उदगीरहून लातूरकडे निघालेली ही बस नळेगाव स्टँडमध्ये थांबली होती. सातच्या सुमारास हा स्फोट झाला. मात्र हा स्फोट कशामुळे झाला याबद्दल अधिकृत माहिती कळू शकली नाही.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार नळेगाव स्टँडमध्ये ही बस थांबलेली होती आणि अचानक हा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती आजूबाजूच्या इमारतींना हादरा बसलाय. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले. हा स्फोट इंजिन गरम झाल्यामुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त होतोय पण इंजिनचा स्फोट इतक्या मोठ्या प्रमाणावर असू शकत नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2013 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close