S M L

एसटी बस स्फोट प्रकरणी नळेगाव बंद

लातूर 11 मे : चाकूर तालुक्यात नळेगाव इथं एसटी बसमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी आज नळेगावात उत्सफूर्त बंद पुकारण्यात आला. नळेगाव एसटी स्थानकावर बसमध्ये स्फोट झाल्यानंतर तब्बल एक तासानंतर पोलीस तिथे पोचल्याचं गावकर्‍यांचं म्हणणं आहे. याचा निषेध म्हणून गावकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळलाय. दरम्यान, काल रात्रीच नांदेड, औरंगाबाद आणि पुणे एटीएसची पथकं नळेगावात दाखल झाली. काल रात्रभर बसस्टँड सील करण्यात आलं होतं. आता ही स्फोट झालेली बस स्टँडमधून हलवण्यात आली आहे आणि सकाळपासून पुन्हा बसस्टँड खुलं करण्यात आलंय. मात्र स्फोट कशामुळे झाला हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 02:01 PM IST

एसटी बस स्फोट प्रकरणी नळेगाव बंद

लातूर 11 मे : चाकूर तालुक्यात नळेगाव इथं एसटी बसमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी आज नळेगावात उत्सफूर्त बंद पुकारण्यात आला. नळेगाव एसटी स्थानकावर बसमध्ये स्फोट झाल्यानंतर तब्बल एक तासानंतर पोलीस तिथे पोचल्याचं गावकर्‍यांचं म्हणणं आहे. याचा निषेध म्हणून गावकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळलाय.

दरम्यान, काल रात्रीच नांदेड, औरंगाबाद आणि पुणे एटीएसची पथकं नळेगावात दाखल झाली. काल रात्रभर बसस्टँड सील करण्यात आलं होतं. आता ही स्फोट झालेली बस स्टँडमधून हलवण्यात आली आहे आणि सकाळपासून पुन्हा बसस्टँड खुलं करण्यात आलंय. मात्र स्फोट कशामुळे झाला हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2013 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close