S M L

भारत देणार पुराव्यांची यादी

2 जानेवारी दिल्लीआशीष दीक्षितमुंबई हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा हात होता, याचे कित्येक पुरावे देवूनही पाकिस्तानने कानावर हात ठेवलेत. पण आता भारताने या पुराव्यांची एक यादीच बनवली आहे. ही यादी लवकरच पाकिस्तानला दिली जाईल. आता तरी पाकिस्तान अतिरेक्यांवर कारवाई करतो का हे पाहायचं आहे.भारताने पुराव्यांची यादी तयार केली आहे. या यादीत दहशतवाद्यांनी त्यांच्या पाकिस्तानातल्या म्होरक्यांना केलेले कॉल्स, कसाबची कबुली आणि दारूगोळा यासारखे काही पुरावे आहेत. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार ही पुराव्यांची यादी पुढच्या आठवड्यात पाकिस्तान, तसंच अमेरिका आणि सौदी अरेबियालाही दिली जाणार आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी मात्र भारताने दिलेल्या पुराव्यावर विचार करू असं म्हटलं आहे. पण पाकिस्तानच्या या बोलण्यावर भारत समाधानी नाही.केवळ विधानं करणं पुरेसं नाही. पाकिस्तानने कृती करायला हवी.अजून तरी त्यांच्या भूमिकेत दखल घेण्याजोगा कुठलाही बदल झालेला नाही असं संरक्षण मंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी म्हटलं आहे. तर परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जीनी पाकिस्तानने आम्हाला जो शब्द दिला होता. तो त्यांनी पाळावा.आणि अतिरेक्यांवर लवकर कारवाई करावी असा इशारा दिला आहे.भारत एकीकडे पाकिस्तानवर दबाव आणत असताना अमेरिके च्या एफबीआयची टीम पाकिस्तानातल्या फरीदकोटमध्ये पोचली आहे. तिथे ते कसाबच्या घरच्यांची डीएनए चाचणी करू इच्छितात.अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राईस यांनी प्रणव मुखजीर्ंना सांगितलंय की एफबीआयच्या अन्वेषणातून भारतासाठी चांगली बातमी लवकरच मिळू शकते. भारताचे पुरावे जरी पाकिस्ताने नाकारले. तरी एफबीआयचे पुरावे नाकारणं मात्र पाकिस्तानला परवडणार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2009 06:35 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2009 06:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close