S M L

वाशिम क्रीडासंकुल ओस पडलंय

3 जानेवारी वाशिमगोविंद वाकडे1998 साली विदर्भात वाशिम या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली. तो पर्यंत उपेक्षित राहिलेल्या या भागाचा विकास आता होईल असं जिल्ह्यातल्या लोकांना वाटलं. पण काही अपवाद वगळता ही आशा फोल ठरली. जिल्ह्यात क्रीडा संकुल उभारण्याची सरकारची योजना 10 वर्ष उलटली तरी अजून पूर्ण झालेली नाही. संकुलासाठी मंजूर झालेला निधीही पडून आहे.वाशिमचं जिल्हा क्रीडा संकुल साडेदहा एकर एवढ्या विस्तीर्ण असलेलं हे मैदान खेळाडूंविना ओस पडलं आहे. इथं जे मोजके खेळाडू येतात, त्यांना प्रशिक्षण द्यायला ना इथं कोणी कोच आहेत ना कार्यालयात वरिष्ठ अधिकारी. प्रशिक्षणाची साधनंही अपुरी आहेत. त्यामुळे अर्थातच खेळाडूंच्या यशावर मर्यादा पडत आहेत.सप्टेंबर 2002मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या क्रीडा संकुलाचं भूमीपूजन झालं. त्यानंतर इथलं बांधकाम कधी पुढे सरकलंच नाही. गेल्या 7 वर्षात या संकुलात फक्त वसतीगृह, रनिंग ट्रॅक आणि सभागृह बांधून पूर्ण झालं आहे. पण स्विमिंग पूल, प्रेक्षक गॅलरी आणि 800 मीटरचा धावण्याचा ट्रॅक अशी कितीतरी कामं अद्याप रखडली आहेत. शिवाय पूर्ण वेळचा क्रीडा अधिकारी आणि विविध खेळांचे प्रशिक्षक अशी कितीतरी पदं अजून भरलेली नाहीत. निदान जी मैदानं तयार आहेत अशा खेळांसाठी लवकरात लवकर प्रशिक्षक नेमण्याची मागणी आता इथल्या गावक-यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2009 08:54 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2009 08:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close