S M L

अकोल्यातली सावित्रीची लेक साबिया अंजुम सौदागर

3 जानेवारी , अकोलाप्रवीण मनोहर अकोल्यातल्या साबिया अंजुम सौदागर या जिल्हापरिषद अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणा-या महाराष्ट्रातल्या पहिल्या अल्पसंख्यांक महिला आहेत. त्यांची आठवण होण्याचं कारण म्हणजे महिला मुक्ती दिन. 3 जानेवारी हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन. सावित्रीबाईंनी दिलेला वसा, स्त्रियांनी वारसा म्हणून चालवला. त्याचंच फळ साबिया अंजुम सौदागर यांच्या रुपानं दिसत आहे. साबिया अंजुम सौदागर यांनी आपल्या यशाचं श्रेय सावित्रीबाईंना दिलं आहे. अकोल्यातल्या हिवरखेड या छोट्याशा गावात लाल दिव्याची गाडी येऊ शकली ती साबीया अंजूम सौदागरमुळं. भारिप बहूजन महासंघानं जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत तिला उमेदवारी दिली, आणि जिंकून आल्यावर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदच दिलं. साबिया यांना आता महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. " आमच्या गावात पाण्याची समस्या बिकट आहे. ही पाण्याची समस्या मला सोडवायची आहे, " असं साबिया म्हणाली. आपला बांगड्यांच्या व्यवसाय संभाळत असतानाच सबियांना हिवरखेड आणि परिसरातल्या सगळ्या जाती धर्माच्या महिलांचा संबंध आला. त्यातूनच मग साबियांना त्यांची सुखदु:ख समजली. समाजातील मुलांमुलींमधे केल्या जाणा-या भेदभावाबद्दल साबीया यांना खंत वाटते. समाजातल्या सर्व मुलींपयंर्त त्यांना शिक्षण पोहचवायचं आहे. " जुन्या अंधश्रद्धेला मला छेद द्यायचा आहे, मुलींंपर्यंत शिक्षण पोहोचवायचं आहे. आपल्यामध्ये आलेल्या या जागृतीचं श्रेय त्यांनी सावित्री बाईंना दिलं आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2009 09:18 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2009 09:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close