S M L

कुर्ल्यातला आगळावेगळा क्रीडामहोत्सव

3 जानेवारी मुंबईस्वाती घोसाळकरक्रीडा महोत्सवांच आयोजन आपल्यासाठी नवीन नाही. पण कुर्ल्यामध्ये एक आगळावेगळा क्रीडा महोत्सव भरवण्यात आला आहे. हा क्रीडा महोत्सव आहे झोपडपट्टीतल्या गरीब मुलांसाठी. या स्पर्धेत इतर स्पर्धांसारखा झगमगाट नाही. पण खेळाडूंमधील जिद्द आणि जिगर मात्र तीच आहे. मुंबईच्या कुर्ला येथील शाळांतील गरीब मुलांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील कामगिरीवर बच्चेकंपनीही खूश आहे. या स्पर्धेद्वारे जास्तीत जास्त मुलांना खेळाकडे वळवण्याचं मुख्य आव्हान संयोजकांच्या समोर आहे.गरिबीमुळे खेळायला न मिळणा-या मुलांना परत मैदानाकडे वळवण्याचा संयोजकांचा प्रयत्न या स्पर्धेमुळे यशस्वी झाला. पण आता त्याचा पुढचा टप्पा असणार आहे या खेळाडूतून स्टार खेळाडू घडवण्याचा.खेळाडूच्या विकासात गरिबीचा अडसर येऊ नये यासाठी संयोजकांनी पुढाकार घेतला आहे. गुणवत्ता असणा-या खेळाडूला आर्थिक मदत करण्याची योजनाही त्यांनी आखली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2009 08:18 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2009 08:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close