S M L

उत्तर भारतातल्या थंडीनं घेतला 30 जणांचा बळी

4 जानेवारी, पंजाबउत्तर भारतात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. थंडीमुळं उत्तर भारतात आतापर्यंत तीस जणांचा बळी गेला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे आणि विमानसेवांचं वेळापत्रक अजूनही विस्कळीत आहे. कमी झालेल्या तापमानामुळे आणि जोरदार धुक्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. दाट धुक्यामुळे पंजाबच्या कित्येक भागांमध्ये जवळचं दिसणं अशक्य झालं आहे. लुधियाना, फिरोझपूर, जालंधर, अमृतसर आणि गुरुदासपूरमध्ये थंडीचा कडाका सगळ्यात जास्त जाणवतोय. तसंच जम्मू काश्मीर, दिल्ली आणि राजस्थानमध्येही जोरदार थंडी पडली आहे. अजून दोन दिवस धुक्याचं साम्राज्य राहणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे विमान आणि रेल्वेनं प्रवास करणार्‍या प्रवाशांचे हाल सुरूच राहणार आहेत. उत्तर रेल्वेनं 13 ट्रेन्स महिनाभरासाठी रद्द केल्या आहेत. तर विमान सेवेवरही याचा परिणाम झालाय. देशांतर्गत 6 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. दिल्लीकडे येणारी 24 विमानंही रद्द करण्यात आली आहेत. तर 10 आंतरराष्ट्रीय उड्डाणंही उशिरानं होणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2009 03:51 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2009 03:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close