S M L

संगीतकार आर.डी.बर्मन यांचा स्मृतिदिन

4 जानेवारी, मुंबई 4 जानेवारी हा आर डी बर्मन यांचा स्मृतीदिन. 4 जानेवारी 1994 साली त्यांचं निधन झालं आहे. पण त्यांच्या अजरामर गाण्यांनी आजही ते आपल्यातच आहेत. जन्मजात संगीताचा वारसा लाभलेले आरडी बर्मन म्हणजेच पंचमदा. पंचमदांनी प्रत्येक मूडची गाणा तयार केली. 1961पासून स्वतंत्रपणे म्युझिक देणार्‍या पंचमदांनी जवळजवळ 331 सिनेमांना संगीत दिलं आहे. त्यात तेलगू, तामीळ,ओरिया, बंगाली आणि मराठी सिनेमाही आहे. पंचमदांनी आपल्या संगीतात वेगवेगळे प्रयोग केलेत. जॅझ, रॉक, मेक्सिकन, ब्राझिलियन असं सर्व प्रकारचं संगीत वापरलं. सिनेमातही आणि आल्बममध्येही...आणि रसिकांना ते आवडलंही आहे. आशा भोसले आणि पंचमदा यांच्या गाण्यांनी तर संगीताचं वेगळं विश्वच तयार केलं. हळुवार गाणी, उडती गाणी, रोमँटिक गाणी या ठाच्यातली आर.डी.ची प्रत्येक गाणी कानसेनांच्या ओठांवर रेंगाळलीच आहेत. अगदी त्यांच्या मृत्यूनंतर रिलीज झालेल्या त्यांच्या 1942 अ लव्ह स्टोरी सिनेमातली गाणी हिट ठरली. त्यांच्या स्मृतीदिनी आयबीएन लोकमतची त्यांना वाहिलेली आदरांजली शेजारच्या व्हिडिओवर पहा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2009 07:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2009 07:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close