S M L

अंध श्याम पेडामकरांची ब्रेल चित्रं

4 जानेवारी, मुंबई अलका धुपकर अंध व्यक्तींना स्पर्शानं लिहिता-वाचता यावं यासाठी सहा ठिपक्यांची ब्रेल लिपी शोधण्यात आली. पण आता या ब्रेलचा उपयोग फक्त लिहिण्या वाचण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर ब्रेलमधून चक्क चित्रंही काढली जाऊ लागली आहेत. श्याम पेडामकर यांनी ही किमया साध्ये केली आहे. अंधकार श्याम पेडामकर ब्रेल लिपीच उपयोग करून सुंदर सुुंदर चित्र काढतात. एकेका ठिपक्याचा उपयोग चित्र काढण्यासाठी करताना श्याम पेडामकरांना खूप विचार करावा लागतो. ब्रेल लिपीत काढलेल्या या चित्रांना लिनीअर ग्राफिक्स म्हणतात. श्याम पेडामकर चित्र काढून थांबत नाहीत तर ती चित्र रंगवतात आणि ब्रेल छापखान्यात एम्बाँसिंगसाठी पाठवतात. रेषा आणि वर्तुळापासून काढलेली चित्रं रंगवणं तसं सोप काम असतं. पण ब्रेलमधल्या चित्रातले ठिपके रंगवणं चॅलेंज असतं. त्यासाठीच श्याम पेडामकर यांनी स्वत:च काचेचा साचा तयार केला आहे. श्याम पेडामकरांचा मित्र त्यांना चित्र रंगवायला मदत करतो. सुरुवातीला पेंटरनं त्यांना नाही असं सांगितलं. पण नंतर श्याम आणि त्यांच्या मित्र या दोघांनी मिळून ती चित्र रंगवायला सुरुवात केली. सुरुवातीची काही पोस्टर्स वाया गेलीत. पण नंतर चित्र रंगवणं हे त्या दोघांना अगदी सहज जमलं आहे. श्याम पेडामकर यांच्या चित्रांची कदर करणारे कुणी भेटले तर त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरायला वेळ लागणार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2009 05:40 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2009 05:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close