S M L

राणेंच बंड थंडावले

5 जानेवारी मुंबई मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राणेंनी उद्याची पत्रकार परिषद रद्द केली आहे. 6 जानेवारीच्या पत्रकार परिषदेत नारायणे राणे आपल्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा करणार होते. पण आता हा निर्णय लांबणीवर टाकला आहे. राणे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. या भेटीची मध्यस्थी सुशीलकुमार शिंदे आणि अंतुले यांनी केल्याचं सांगण्यात येतं. पाऊण तास ही भेट झाली. मात्र या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी मौन पाळलं आहे. राणे यांनी काँग्रेसमध्येच राहावं यासाठी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी केल्याचं समजतं. आता राणे दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेणार आहेत.त्यानंतर त्याचं निलंबनही रद्द करण्यात येईल.तूर्तास राणेंना कोणतही पद देण्यात येणार नसलं तरी त्यांच्या समर्थकांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2009 03:46 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2009 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close