S M L

26/11 तील ग्रेनेड पाकिस्तानमधले

5 जानोवारी, मुंबई मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानचा बचाव उघडा पडलाय. 26 नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचे अनेक पुरावे सापडले आहेत. या पुराव्यांमध्येच सीएसटी स्टेशनवर सापडलेल्या हॅन्ड ग्रेनेडचा समावेश करावा लागेल. हे हॅन्ड ग्रेनेड्स पाकिस्तानात बनवल्याचं सिद्ध झालं आहे. हल्ल्याच्या वेळी कसाब आणि ईस्माईल खान एके 47 मधल्या मॅगजीन बदलताना हॅन्डग्रेनेड्स पोलिसांवर फेकत होते. पोलिसांचं लक्ष विचलित व्हावं हा त्यांचा मुख्य हेतू. पण या हॅन्डग्रेनेडमुळेच हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं सिद्ध झालं आहे. हे ग्रेनेड्स अजीज नावाच्या पाकिस्तानी कंपनीने बनवले आहेत. हे ग्रेनेड्स 3 प्रकारचे आहेत. आणि तिन्ही ग्रेनेड्सची क्षमता वेगवेगळी आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातही अजीज नावाच्या कंपनीत बनवलेली स्फोटकंच वापरण्यात आली होती. पेशावरमधली ही कंपनी गेल्या 15 वर्षांपासून शस्त्रास्त्र निर्मितीचं काम करत आहे. 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यात जे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेनेड्स वापरण्यात आले, ते याच कंपनीचे. एकूणच पाकिस्तानने दहशतवादविरोधी लढ्यात सहभागाचा कितीही आव आणला, तरी त्यांचे दावे पोकळच असल्याचं सिद्ध होऊ लागलं आहे. 26/11 नंतर समोर आलेला प्रत्येक पुरावा पाकिस्तानकडेच बोट दाखवत आहे. या ग्रेनेड्समुळे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याच्या दाव्याला बळकटी मिळाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2009 03:54 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2009 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close