S M L

औरंगाबादमध्ये भूखंड घोटाळा उघड

5 जानेवारी, औरंगाबादसंजय वरकडऔरंगाबाद महापालिकेच्या मालकीच्या काही भूखंडांची परस्पर विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहराच्या मध्यवस्तीत आणि विवेकानंद महाविद्यालयाच्या ताब्यात असलेल्या अशाच एका वादग्रस्त भूखंडांचं विक्री प्रकरण आता उजेडात आलं आहे. या भूंखंडाची किंमत पाच कोटीहून अधिक आहे. सरदार दलिपसिंग यांनी हा भूखंड महापालिकेला दान केला. पण त्याचे रेकॉर्डच गायब करण्यात आले. भूखंडावर आता महापालिकेचा ताबा आहे. पालिकेच्या परवानगीने विवेकानंद महाविद्यालय भूखंडाचा वापर करत आहे. तरीही विष्णू हरिभाऊ शिंदे यांनी हा भूखंड नुकताच विकत घेतलाय. त्यांनी केलेल्या व्यवहाराविषयीच आता संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळं याप्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी होत आहे."हा भूखंड मूळ मालकानं महापालिकेला पंचवीस वर्षांपूर्वी दान केलेला आहे. त्यानंतर त्याचे मूळ मालक वारले, दहा दिवसांपूर्वी त्यांची मुलगीही वारली. महापालिकेनं तिथं मालकी हक्काची पाटीही लावलीय. तरीही त्या भूखंडांची विक्री कशी झाली ? याची चौकशी व्हायला हवी" अशी मागणी शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केली आहे."विवेकानंद महाविद्यालयाच्या भूखंडाविषयी आमच्याकडं तक्रार आलीय, पण हा भूखंड आमच्या मालकीचा आहे, असा कागद सापडत नाहीत. दहा ते पंधरा दिवसांत त्याबाबत सांगता येईल." असं नेहमीचच उत्तर विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी दिली.औरंगाबाद शहरातील क्रांतीचौक इथला शंभर कोटीहून अधिक किंमतीचा भूखंड घोटाळा आयबीएन लोकमतनं उघडकीस आणला. मात्र महापालिकेनं शहरातील अशा अनेक भूखंड घोटाळ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं आता स्पष्ट होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2009 04:32 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2009 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close