S M L

राणे-सोनिया भेट लांबणीवर

6 जानेवारी, मुंबईनारायण राणे यांची दिल्लीवारी लांबणीवर पडली आहे. सोनिया गांधी यांनी भेटीची वेळ दिलेली नसल्यामुळं राणे यांची सोनिया गांधींशी भेट आता लांबणीवर पडली आहे. राणे यांनी काँग्रेस सोडण्याचा आपला बेत रद्द केला आहे. सुशील कुमार शिंदे आणि ए आर अंतुले यांच्या मध्यस्थीमुळे त्यांनी काँग्रेसमध्येच थांबण्याचा निर्णय घेतलाय, असं कळतंय. राणे लवकरच सोनिया गांधी यांना भेटतील. त्यानंतर राणे यांच्या काँग्रेसमध्येच राहण्यावर शिक्कामोर्तब होईल. तसंच राणे यांचं निलंबन रद्द केल्याची अधिकृत घोषणा होईल असं समजतंय. त्यापूर्वी राणे पत्रकारांशी बोलून सोनिया गांधी यांच्याच नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचं जाहीर करतील. 2 जानेवारीला राणेंनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर सुशील कुमार शिंदे आणि ए आर अंतुलेंनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राणेंबाबत चर्चा केली. त्यामुळे राणे यांना काँग्रेस पक्षातच कायम ठेवण्याचा निर्णय झालाय. आता तरी राणेंना मंत्रीपद दिलं जाणार नाही असं समजतं. पण त्याबदल्यात त्यांच्या काही समर्थकांना मंत्रीपदं दिली जाणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2009 06:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2009 06:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close