S M L

आफ्रिकेसमोर 376 रन्सचं आव्हान

6 जानेवारी सिडनीसिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 376 रन्सचं आव्हान ठेवलंय. आणि त्याला उत्तर देताना चौथ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेचे एक विकेटवर 61 रन्स झाले आहेत.शेवटच्या दिवशी त्यांना विजयासाठी आणखी 314 रन्स हवे आहेत. आणि त्यांचे आणखी 8 बॅट्समन खेळायचे आहेत. आफ्रिकेची सुरुवात मात्र खराब झाली. तिस-याच ओव्हरमध्ये ओपनर मॉर्न मॉर्केल शून्यावर आऊट झाला. त्यानंतर मग अमला आणि मॅकेंझी यांनी नाबाद हाफ सेंच्युरी पार्टनरशिप केली.त्यापूर्वी टीनंतर काही वेळातच ऑस्ट्रेलियाने आपली दुसरी इनिंग चार विकेटवर 257च्या स्कोअरवर घोषित केली. दुस-या इनिंगमध्ये सायमन कॅटिच आणि कॅप्टन रिकी पाँटिंगने शानदार हाफ सेंच्युरी ठोकली. दोघं आऊट झाल्यावर माईक हसी आणि मायकेल क्लार्क यांनीही भराभर रन्स वाढवले. टीमने 250 रन्सचा टप्पा ओलांडल्यावर लगेचच पाँटिंगने इनिंग घोषित केली. हसी 45 तर क्लार्क 41 रन्सवर नॉटआऊट राहिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2009 10:42 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2009 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close