S M L

सोलापूरजवळ अपघात, 7 ठार

7 जानेवारी, सोलापूरसोलापूर - बोरमनी जवळ भीषण अपघात झाला आहे. खासगी बस आणि टाटा सुमो यांच्यामध्ये हा अपघात झाला . या अपघातात 7 जण ठार तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.रात्री उशिरा हा अपघात झाला. पुण्याहून येणार्‍या खासगी बसवर टाटा सुमो आदळल्याने हा अपघात झाला. सुमो हैदराबादला जात होती. या आठवड्यातला हा दुसरा अपघात आहे. येथून साधारण पाच किलोमीटरवर झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले होते. सरळ रस्ता आणि हायवे असल्यामुळे येथे प्रचंड वेगात वहाने जातात. अपघाताच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघण्याची मागणी गेले चार ते पाच वर्ष होत आहे, पण प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना न केल्याने अपघातांचं प्रमाण वाढत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2009 05:21 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2009 05:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close