S M L

मतदारांच्या मदतीला वेबसाईट

7 जानेवारी, मुंबईरोहिणी गोसावीनिवडणुका आल्या की उमेदवारांची जाहीरातबाजी आणि आश्वासनं देणं सुरु होतं. आणि बरेच लोक या आश्वासनांना भुलतातसुद्धा. पण आपलं मत योग्य उमेदवाराला मिळावं असं वाटत असेल तर मत देण्याआधी एक वेबसाईट पाहा... मुंबईतल्या उमेदवाराची संपूर्ण माहिती देणारी ही वेबसाईट तयार केलीय विवेक गिलानी यानं. या वेबसाईटचं नाव आहे मुंबईव्होटस् डॉट कॉम.केवळ अटलबिहारी वाजपेयींच्या कविता आवडतात म्हणून विवेकनं वाजपेयींना 2004 मध्ये मत दिलं होतं. बर्‍याच मतदारांचं असंच असतं. उमेदवाराच्या कामाऐवजी त्याच्या इतर गोष्टींचाच प्रभाव मतदारावर पडतो. बर्‍याचदा मतदार वरवरच्या व्यक्तिमत्वाला आणि भूलथापांना बळी पडतो. असं होऊ नये आणि लायक उमेदवाराला मत मिळावं म्हणून मुंबईव्होटस् डॉट कॉम ही वेबसाईट तयार करण्यात येत आहे.या वेबसाईटवर आमदार, खासदारांसह अगदी नगरसेवकांचीही सर्व माहिती टाकण्यात येणार आहे. 2004 पासुन त्यांनी केलेलं काम, पेपरमध्ये त्यांच्याविषयी छापून येणार्‍या बातम्या, त्यांच्या कामाचं रेटिंग या वेबसाईटवर करण्यात येईल. यासाठी या उमेदवारांचा पद्धतशीरपणे रिसर्च करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा भूतकाळ आणि त्यांची खरी प्रतिमा लोकांना कळेल. अशाप्रकारच्या माहितीमुळं मतदार अधिक जागरुक होऊन आपलं मत देऊ शकतो.वेबसाईटवर अजुन संशोधन सुरू आहे. मुंबईतल्या काही कॉलेजेसमधली जवळपास 90 मुलं या कामात विवेकला मदत करत आहेत 15 मार्चला ही वेबसाईट लाँच करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2009 07:05 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2009 07:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close