S M L

ट्रॅफिक पोलिसांना मिळाले वॉकी-टॉकी

7 जानेवारी, पुणेस्नेहल शास्त्रीपुण्यातल्या वाहतुकीचा प्रश्न सुधारण्यासाठी पुणे ट्रॅफिक पोलीस सुसज्ज होत आहेत. पुण्यातल्या प्रत्येक चौकातल्या ट्रॅफिक पोलिसांच्या हातात वॉकी टॉकी देण्यात आले आहेत. यामुळं ट्रॅफिकचे नियम मोडले जाणार्‍यांवर कडक कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.अनेकदा पुणेकर सिग्नल तोडून जाताना ट्रॅफिक पोलिसांनाही चुकवतात, तर कधी कधी चार चाकी छोट्या गाड्यांना धडकूनही जातात. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना याचा बराच उपयोग होणार आहे. तर दुसरीकडे पोलिसांकडच्या वॉकीटॉकीचा योग्य उपयोग झाला पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे.वॉकी टॉकीचा फायदा वाहतूक नियंत्रणात होईल हे खरं, पण पुणे शहरात दररोज 60 ते 70 टू व्हीलर्स, आणि तेवढ्याच फोर व्हीलर्स येतात. त्यांच्या नियंत्रणासाठी मुळात ट्रॅफिक पोलिसांची संख्याच अपुरी आहे. अशा वेळी पोलिसांची संख्या वाढवण्याऐवजी वॉकी टॉकीचा कितपत फायदा होईल ? असाही प्रश्न विचारला जात आहे.आतापर्यंत 100 वॉकीटॉकींसाठी 10 लाख ट्रॅफिक पोलिसांनी खर्च केले आहेत. सध्या तरी पुण्यातल्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरू केलेली ही सुविधा लवकरच संपूर्ण पुण्यात राबवण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2009 07:10 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2009 07:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close