S M L

कसाब पाकिस्तानीच

7 जानेवारी26/11च्या मुंबई हल्ल्यात पोलिसांनी पकडलेला दहशतवादी कसाब हा पाकिस्तानी असल्याचं पाकिस्तानने अखेर कबूल केलं आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी हे कबूल केलं आहे. डॉन या पेपरला तसंच जिओ टीव्ही या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कसाब पाकिस्तानी नागरिक असल्याचं मान्य केलं आहे कसाब हा मुंबई हल्ल्यातला एकमेव जिवंत दहशतवादी आहे. मुंबई हल्ल्यातले दहशतवादी पाकिस्तानी असल्याच्या मुद्यावरून सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार वाद सुरू आहेत.कसाब पाकिस्तानातील फरिदकोटचा नागरिक असल्याचं पाकिस्ताननं मान्य केलं आहे. आमच्या चौकशीतून ही माहिती उघड झाल्याचं पाकिस्तानी सुरक्षा सल्ल्गारांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे पाक पंतप्रधानांकडे सोपवले जातील, असंही त्यांनी सांगितलं.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे सबळ पुरावे मिळाले होते. या हल्ल्यातील ग्रेनेड्स आणि शस्त्रास्त्रे पाकिस्तानातून आल्याचं स्पष्ट झालं होतं. या दहशतवाद्यांनी हायजॅक केलेल्या कुबेर या बोटीवर पाकिस्तानी कंपन्यांचं सामान सापडलं होतं. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीनंही स्टिंग ऑपरेशन करून कसाब पाकिस्तानीच असल्याचं सिद्ध केलं होतं. एफबीआयनं देखील उपल्ब्ध पुराव्यांवरून कसाब पाकिस्तानीच असल्याचं मानलं होतं. हे सर्व पुरावे याआधीच पाकिस्तानकडे देण्यात आले होते. पाकिस्ताननं मात्र कसाब पाकिस्तानी असल्याचं वारंवार नाकारलं होतं. यासंदर्भात भारतानं पाकिस्तानवर प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव आणला होता. अमेरिकी परराष्ट्रमंत्री कोंडोलिझा राईस यांनी त्याबद्दल पाकिस्तानला कडक शब्दात समज दिली होती. पाकचा हा दुटप्पीपणा भारतानं वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडला होता. भारताच्या या प्रयत्नांपढे झुकून पाकिस्तानी सुरक्षा सल्लागारांनी कसाब पाकिस्तानी असल्याचं अखेरीस मान्य केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2009 12:35 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2009 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close