S M L
  • संजय दत्त कोर्टाला शरण

    Published On: May 16, 2013 12:14 PM IST | Updated On: May 17, 2013 01:58 PM IST

    मुंबई 15 मे : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्त टाडा कोर्टाला शरण आला आहे. सुप्रीम कोर्टाने चार आठवड्याची दिलेली मुदवाढ आज संपली आहे. आज दुपारी 1.30 च्या सुमारास संजय दत्त आपल्या पालीहिल येथील निवासस्थानातून कोर्टाकडे रवाना झाला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी मान्यता, बहिण प्रिया आणि दिग्दर्शक महेश भट्ट सोबत होते. यावेळी त्याच्या चाहत्यांनी आणि माध्यमांनी घरासमोर प्रचंड गर्दी केली होती. संजय दत्त कोर्टाकडे आपल्या इनोव्हा कारमध्ये रवाना झाला. या कारमध्ये संजय दत्त सोबत त्याची बहिण प्रिया दत्ता आणि महेश भट्ट सोबत होते. संजय कोर्टापर्यंत पोहचेपर्यंत माध्यमांच्या प्रतिनिधींनी अक्षरश: त्याच्या कारसोबत दौड लावली. तीनच्या सुमारास कोर्टात तो हजर झाल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याच्या कारला एकच गराडा घातला. त्याला कारमधून बाहेर निघणेही मुश्किल झाले होते. महेश भट्ट यांनी कारमधून बाहेर येऊन संजयला कोर्टात जाऊ द्या थोडे पाठी मागे व्हा असं हात जोडून आवाहन केलं. तरी सुद्धा गर्दी मागे हटण्यास तयार नव्हती. अखेरीस खुद्द संजय दत्त कारमधून बाहेर येऊन हात जोडून विनंती केली. मला शरण यायचं आहे, मला जाऊ द्या अशी विनंती त्याने केली. गर्दी इतक्या मोठ्याप्रमाणावर होती की पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतली होती. अखेर प्रचंड गर्दीतून वाट काढत कसाबसा संजय दत्त कोर्टात दाखल झाला. आता त्याला कोणत्या कोर्टात जावं लागणार याबाबत लवकरच कोर्टाचा निर्णय जाहीर होईल. या अगोदर संजयने येरवडा जेलमध्ये शरण येण्याची याचिका मागे घेतली आहे.कोर्टाची कायदेशीर कारवाई पूर्ण होऊन त्याला आज आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे. नंतर त्याला दुसर्‍या जेलमध्ये हलवलं जाईल. महिनाभर मिळणार घरचं जेवणदरम्यान, टाडा कोर्टाबाहेर आपल्याला धक्काबुक्की झाली असून त्यामुळे छातीत दुखायला लागल्याची तक्रार त्याने कोर्टात केली. संजय दत्तची त्याला घरचं जेवण आणि औषध देण्याची विनंती कोर्टाने एक महिन्यासाठी मान्य केली आहे. त्यानंतर त्याला तुरुंगातलं जेवण जेवावं लागणार आहे. मात्र त्याला इलेक्ट्रॉनिक सिगारेट सोबत ठेवण्याची विनंती टाडा कोर्टाने अमान्य केली आहे. संजय दत्तचा गेल्या वीस वर्षातील प्रवास16 जानेवारी 1993- अबू सालेम संजय दत्तकडे हत्यार घेऊन गेला- 9 एके - 56 रायफल आणि 80 हँडग्रेनेड घेऊन गेला होता- सालेमसोबत बाबा मुसा चौहान, समीर हिंगोर हनीफ कडावाला होते- एप्रिल 1993 रोजी तपासात संजय दत्तकडे हत्यार असल्याचं उघड झालं- एप्रिल महिन्यातच संजयचे साथीदार बाबा मुसा चौहान, समीर हिंगोर, हनीफ कडावालांना अटक19 एप्रिल 1993- संजय दत्त मॉरिशसहून येताच, क्राईम ब्रँचनं अटक केली26 एप्रिल 1993- संजय दत्तला पोलीस कोठडी देण्यात आली3 मे 1993- संजयची मुंबई हायकोर्टाने जामिनावर सुटका झाली4 जुलै 1993- कट रचल्याच्या आरोपाखाली सीबीआयने संजय दत्तला पुन्हा अटक केली- सीबीआयने त्याला टाडा कायद्याखाली अटक केली होती16 ऑक्टोबर 1995- संजय दत्तला जामीन मिळाला28 नोव्हेंबर 2006- टाडा कोर्टानं त्याला दोषी ठरवलं- त्याच दिवशी तो सरेंडर झाला- मात्र निकालाची प्रत न मिळाल्याने त्याला सुप्रीम कोर्टाने तात्पुरता जामीन दिला31 जुलै 2007- संजय दत्तला शिक्षा सुनावण्यात आली20 ऑगस्ट 2007- संजय दत्त सरेंडर झाला20 ऑगस्ट - 28 नोव्हेंबर- सव्वातीन महिने तो तुरुंगात होता28 नोव्हेंबर 2007- संजय दत्तला जामीन मिळाला21 मार्च 2013- सुप्रीम कोर्टाने त्याच्या अपिलावर निकाल दिला- त्याची शिक्षा एका वर्ष कमी केली, ती पाच वर्ष झाली28 मार्च 2013- सरेंडर होण्यासाठी वेळ मागणार नाही- माफीसाठी अर्ज करणार नाही, असं संजयनं जाहीर केलं15 एप्रिल 2013- सरेंडर होण्याच्या मुदतीपूर्वी 3 दिवस आधी कोर्टात याचिका- सरेंडर होण्यासाठी 6 महिन्यांची मुदत मागितली- अनेक चित्रपट अर्धवट असल्याचं दिलं कारण17 एप्रिल 2013- सरेंडर होण्यासाठी कोर्टानं दिली चार आठवड्यांची मुदत - संजयनं पुनर्विचार याचिका दाखल केली12 मे 2013- संजयची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली16 मे 2013- संजय दत्त शरण येण्यासाठी कोर्टात हजर

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close