S M L

ओबामांनी मौन सोडलं

7 जानेवारी अखेर इस्त्रायलनं सुरू केलेल्या हल्ल्यांबाबत अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मौन सोडलंय. नागरी भागात इस्त्रायलने केलेल्या हल्ल्याबाबत ओबामा म्हणाले, निरपराध लोकांचे जीव घेण्याचा कुणालाच नैतिक अधिकार नाही, त्यावर अमेरिका काहीच बोलत नाही, याचा अर्थ आम्ही शांत आहोत, असा होत नाही. मी केवळ अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारण्याची वाट पाहतोय, असा गर्भित इशाराही ओबांमा यांनी दिला आहे. बराक ओबामा यांनी इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गाझापट्टीवर चाललेल्या युद्धाबाबत चिंता व्यक्त केली. पण याच्याशी अल-कायदाला काही सोयर सूतक दिसत नाही. एका गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार, अल-कायदाचा उपप्रमुख जवाहिरी याने ओबामांनाच दोषी धरलंय. इस्त्रायलने गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्याबाबत त्यानं ओबामांवरच आरोप केले आहेत. तशा प्रकारचा एक ऑडिओ मेसेज अल-कायदाच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2009 04:55 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2009 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close