S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्र आघाडीची घोषणा
  • प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्र आघाडीची घोषणा

    Published On: May 20, 2013 03:02 PM IST | Updated On: May 20, 2013 03:02 PM IST

    मुंबई 20 मे : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी 23 राजकीय पक्षांनी महाराष्ट्र लोकशाही आघाडी स्थापन केली आहे. यामध्ये भारिप बहुजन महासंघ, सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र विकास आघाडी, विद्रोही शाहिरी जलसा सह 23 पक्षांचा सहभाग आहे. जनता सध्या नवा पर्याय शोधत आहे. त्यामुळे आमची आघाडी ही एक नवा पर्याय ठरू शकते. आज सामाजिक क्षेत्रातील कार्य करणार्‍या व्यक्तींची जनमानसात विश्वासहर्ता आहे. या व्यक्तींनी राजकारणात सहभागी करून घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या विश्वासहर्तेचा फायदा होईल असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र लोकशाही आघाडी - घटक पक्षभारिप बहुजन महासंघसत्यशोधक कम्युनिस्ट पार्टीमहाराष्ट्र विकास आघाडीविद्रोही शाहिरी जलसालालनिशाण पक्षलालनिशाण पार्टीलोकसंघर्ष मोर्चापंॅथर रिपब्लिकनओबीसी फाऊंडेशन

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close