S M L
  • सीसीटीव्ही फूटेजमध्ये बुकी कैद

    Published On: May 21, 2013 11:51 AM IST | Updated On: May 21, 2013 11:51 AM IST

    औरंगाबाद 21 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी औरंगाबादमध्ये ती बुकीना अटक करण्यात आली होती. ज्या तीन बुकीजना अटक करण्यात आलं त्याबाबतचं सीसीटीव्ही फुटेज आता IBN लोकमतच्या हाती लागलंय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तिन्ही फिक्सर्स अगदी स्पष्ट दिसत आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज पाहताना हे दिसतं की, या बुकीजची गाडी हॉटेलमध्ये शिरतेय. तर दुसर्‍या फुटेजमध्ये बुकी सुनील भाटीया हॉटेलच्या रिसेप्शनवर चौकशी करत असल्याचं दिसतंय. त्यात तो आपलं ओळखपत्र म्हणून त्याच्या पास्टपोर्टची प्रत देतानाही दिसतंय. त्यानंतर हे तीनही बुकी आत प्रवेश करताना आहेत. ही वेळ रात्री साडेबाराची आहे. त्यानंतर चार तासांनीच म्हणजेच सकाळी साडेचारच्या सुमाराला दिल्ली पोलीस या हॉटेलमध्ये प्रवेश करतात. हॉटेलच्या रिसेप्शनवर चौकशी करताहेत, काही कागदपत्रांचीही पाहणी करताहेत. सुनील भाटीया, किरण डोले आणि मनिष गुड्डेवार या तिघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती न देता या आरोपींना दिल्लीला नेण्यात आलं. शिर्डीहून नागपूरला परतत असताना एक दिवसाच्या मुक्कामासाठी हे आरोपी औरंगाबादच्या सिडकोमधल्या हॉटेल लेमन ट्रीमध्ये मुक्कामाला थांबले असताना या तिघांना अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या आरोपींचे फोन ट्रेस करत पोलीस त्यांच्या मागावर होते. त्यानुसार कारवाई करत अशा प्रकारे हे आरोपी दिल्ली पोलिसांच्या हाती लागले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close