S M L

'PWD च्या 12 अभियंत्यांनी नातेवाईकांना दिली कंत्राटं'

मुंबई 13 मे : राज्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अनेक इंजिनीअर्सनी आपल्याच नातेवाईकांना बांधकामांची कंत्राटं दिली असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. असा घोटाळा करणार्‍या 12 इंजिनीअर्सची यादी त्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि अँटी करप्शन ब्युरोला दिली. स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम स्थापन करून या घोटाळेबाजांची चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. हे ते 12 इंजिनिअर आणि त्यांचे नातेवाईक - PWDचे नाशिकमधले चीफ इंजिनिअर जळकोटे यांनी पत्नीच्या आर. जे. बिल्डकॉन या कंपनीला कंत्राट दिलं - पुण्यातले एक्झिक्युटिव्ह इंजीनिअर बी. डी. तोरकरी यांनी मुलगी रजनी हिच्या रजनी तोरकरी कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिलं- जालन्याचे जॉईंट इंजिनिअर मसुद्दीन यांनी मुलाची कोहीनूर कंस्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिलं.- नागपुरात डेप्युटी इंजिनिअर टी. पी. राठोड यांनी मुलाच्या जुनगो राठोड कंस्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिलंय. - त्याचप्रमाणे औरंगाबादमध्ये एक्झीक्युटीव्ह इंजिनीअर्स बी. एस. खांदे यांनी त्यांचा मुलगा अनमोल याच्या अनमोल कंस्ट्रक्शनला बांधकाम कंत्राट दिलं. - औरंगाबादचे डेप्युटी इंजिनिअर एच. एम. पाटील यांनी मुलगा गौरव याच्या गौरव कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिलंय. - औरंगाबादचेच आणखी एक डेप्युटी इंजिनिअर बी. के. अदमावे यांनी पत्नी जयश्री हिच्या अदमावे कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिल्याचं सोमय्या यांचं म्हणणंय. - पुण्याचे डेप्युटी इंजिनिअर गोलेश्वर यांनीही आपल्या मुलाच्या कंपनीला कंत्राट दिलंय. - परभणीमध्ये डेप्युटी इंजिनिअर धोंडिबा शर्मा यांनी मुलगा दीपक याच्या दीपक शर्मा कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. - डेप्युटी इंजिनिअर बी. आर. धवने यांनी त्यांचा मुलगा प्रवीण धवने याच्या संस्कृती कंस्ट्रक्शनला कंत्राट दिल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. - ज्वाईंट इंजिनिअर बी. टी. अहिरे यांनी त्यांचा मुलगा बाबासाहेब यांच्या सोनाली कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिलंय. - आणि ज्वाईंट इंजिनिअर एन. के. झोहरे यांनीसुद्धा आपल्या मुलाच्या कंपनीला कंत्राट दिलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2013 05:40 PM IST

'PWD च्या 12 अभियंत्यांनी नातेवाईकांना दिली कंत्राटं'

मुंबई 13 मे : राज्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अनेक इंजिनीअर्सनी आपल्याच नातेवाईकांना बांधकामांची कंत्राटं दिली असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. असा घोटाळा करणार्‍या 12 इंजिनीअर्सची यादी त्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि अँटी करप्शन ब्युरोला दिली. स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम स्थापन करून या घोटाळेबाजांची चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

हे ते 12 इंजिनिअर आणि त्यांचे नातेवाईक

- PWDचे नाशिकमधले चीफ इंजिनिअर जळकोटे यांनी पत्नीच्या आर. जे. बिल्डकॉन या कंपनीला कंत्राट दिलं - पुण्यातले एक्झिक्युटिव्ह इंजीनिअर बी. डी. तोरकरी यांनी मुलगी रजनी हिच्या रजनी तोरकरी कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिलं- जालन्याचे जॉईंट इंजिनिअर मसुद्दीन यांनी मुलाची कोहीनूर कंस्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिलं.- नागपुरात डेप्युटी इंजिनिअर टी. पी. राठोड यांनी मुलाच्या जुनगो राठोड कंस्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिलंय. - त्याचप्रमाणे औरंगाबादमध्ये एक्झीक्युटीव्ह इंजिनीअर्स बी. एस. खांदे यांनी त्यांचा मुलगा अनमोल याच्या अनमोल कंस्ट्रक्शनला बांधकाम कंत्राट दिलं. - औरंगाबादचे डेप्युटी इंजिनिअर एच. एम. पाटील यांनी मुलगा गौरव याच्या गौरव कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिलंय. - औरंगाबादचेच आणखी एक डेप्युटी इंजिनिअर बी. के. अदमावे यांनी पत्नी जयश्री हिच्या अदमावे कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिल्याचं सोमय्या यांचं म्हणणंय. - पुण्याचे डेप्युटी इंजिनिअर गोलेश्वर यांनीही आपल्या मुलाच्या कंपनीला कंत्राट दिलंय. - परभणीमध्ये डेप्युटी इंजिनिअर धोंडिबा शर्मा यांनी मुलगा दीपक याच्या दीपक शर्मा कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. - डेप्युटी इंजिनिअर बी. आर. धवने यांनी त्यांचा मुलगा प्रवीण धवने याच्या संस्कृती कंस्ट्रक्शनला कंत्राट दिल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. - ज्वाईंट इंजिनिअर बी. टी. अहिरे यांनी त्यांचा मुलगा बाबासाहेब यांच्या सोनाली कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिलंय. - आणि ज्वाईंट इंजिनिअर एन. के. झोहरे यांनीसुद्धा आपल्या मुलाच्या कंपनीला कंत्राट दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2013 05:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close