S M L

'यूपीए'ची जाहिरातबाजी, दिला 'भारत निर्माण'चा नारा !

नवी दिल्ली 14 मे : 2014 च्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आणि यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून की काय यूपीएने जाहिरातीचं नारळ फोडलं आहे. यूपीए सरकारने 'भारत निर्माण' नावानं जाहिरात मोहीम सुरू केली आहे. या जाहिरातींमध्ये यूपीएनं गेल्या 9 वर्षांत राबवलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आलीय. टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रांतून या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहेत. यापूर्वी एनडीए सरकारने निवडणुकीच्या आधी 'इंडिया शायनिंग' मोहीम राबवली होती. त्यामुळे यूपीए सरकारनेही निवडणुकांची तयारी सुरू केली आहे की काय, या चर्चेला सुरुवात झाली. पण ही राजकीय मोहीम नाही असा दावा काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी केला.2 जी घोटाळा, कोळसा घोटाळा, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा, रेल्वे घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांच्या जाळ्यात अडकलेल्या यूपीएची प्रतिमा चांगलीच डागाळलीय. पण, वर्षभरावर येऊन ठेपलेली सार्वत्रिक निवडणूक बघता यूपीए आता आपली प्रतिमा उजळण्याच्या तयारीला लागलीय. भारत निर्माण नावानं सरकारनं जाहिरातीची मोहीम उघडलीय. गेल्या 9 वर्षांत सरकारनं राबवलेल्या उपक्रमांची माहिती या जाहिरातींमधून देण्यात येतेय. या जाहिरातींसाठी काँग्रेसनं तब्बल 180 कोटी रुपये खर्च केलेत. जाहिरातींसाठीचं लेखन सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केलंय तर दिग्दर्शन केलंय प्रदीप सरकारनं... पण, याची तुलना एनडीएच्या इंडिया शायनिंगशी करू नका, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. यापूर्वी 'जय जवान जय किसान', 'गरिबी हटाओ', 'अब की बारी अटल बिहारी' यासारख्या घोषणांचा पक्षांना फायदा झाला. पण, प्रत्येकच जाहिरातीचा फायदा झाला असंही नाही. दहा वर्षांपूर्वी एनडीएने राबवलेली 'इंडिया शायनिंग' ही 100 कोटींची जाहिरात मोहीम अक्षरश: तोंडावर पडली आणि 2004च्या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर आली ती ही जाहिरात... 'युपी में दम है क्युकी जुर्म यहा कम है' अभिनेता अमिताभ बच्चनही ही जाहिरात केली असली तरी यूपीच्या मतदारांनी 2007मध्ये समाजवादी पक्षाला घरचा रस्ता दाखवला. प्रसिद्धीने उदय झाला तर प्रसिद्धीनंच अंतही होतो, असं म्हणतात. आपल्याबाबतीत हे घडू नये, असंच काँग्रेसला वाटत असणार, यात मात्र शंका नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 05:05 PM IST

'यूपीए'ची जाहिरातबाजी, दिला 'भारत निर्माण'चा नारा !

नवी दिल्ली 14 मे : 2014 च्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आणि यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून की काय यूपीएने जाहिरातीचं नारळ फोडलं आहे. यूपीए सरकारने 'भारत निर्माण' नावानं जाहिरात मोहीम सुरू केली आहे. या जाहिरातींमध्ये यूपीएनं गेल्या 9 वर्षांत राबवलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आलीय. टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रांतून या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहेत. यापूर्वी एनडीए सरकारने निवडणुकीच्या आधी 'इंडिया शायनिंग' मोहीम राबवली होती. त्यामुळे यूपीए सरकारनेही निवडणुकांची तयारी सुरू केली आहे की काय, या चर्चेला सुरुवात झाली. पण ही राजकीय मोहीम नाही असा दावा काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी केला.

2 जी घोटाळा, कोळसा घोटाळा, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा, रेल्वे घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांच्या जाळ्यात अडकलेल्या यूपीएची प्रतिमा चांगलीच डागाळलीय. पण, वर्षभरावर येऊन ठेपलेली सार्वत्रिक निवडणूक बघता यूपीए आता आपली प्रतिमा उजळण्याच्या तयारीला लागलीय. भारत निर्माण नावानं सरकारनं जाहिरातीची मोहीम उघडलीय. गेल्या 9 वर्षांत सरकारनं राबवलेल्या उपक्रमांची माहिती या जाहिरातींमधून देण्यात येतेय.

या जाहिरातींसाठी काँग्रेसनं तब्बल 180 कोटी रुपये खर्च केलेत. जाहिरातींसाठीचं लेखन सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केलंय तर दिग्दर्शन केलंय प्रदीप सरकारनं... पण, याची तुलना एनडीएच्या इंडिया शायनिंगशी करू नका, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

यापूर्वी 'जय जवान जय किसान', 'गरिबी हटाओ', 'अब की बारी अटल बिहारी' यासारख्या घोषणांचा पक्षांना फायदा झाला. पण, प्रत्येकच जाहिरातीचा फायदा झाला असंही नाही. दहा वर्षांपूर्वी एनडीएने राबवलेली 'इंडिया शायनिंग' ही 100 कोटींची जाहिरात मोहीम अक्षरश: तोंडावर पडली आणि 2004च्या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

यानंतर आली ती ही जाहिरात... 'युपी में दम है क्युकी जुर्म यहा कम है' अभिनेता अमिताभ बच्चनही ही जाहिरात केली असली तरी यूपीच्या मतदारांनी 2007मध्ये समाजवादी पक्षाला घरचा रस्ता दाखवला. प्रसिद्धीने उदय झाला तर प्रसिद्धीनंच अंतही होतो, असं म्हणतात. आपल्याबाबतीत हे घडू नये, असंच काँग्रेसला वाटत असणार, यात मात्र शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2013 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close