S M L

भुजबळांचे सहाय्यक बेडसेंची तडकाफडकी बदली

नाशिक 15 मे : सार्वजनिक बांधकाम खात्यातील लाचखोर प्रकरणामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडालीय. लाचखोर अधिकार्‍यांकडे कोट्यावधींची संपत्ती सापडली आहे. आता या प्रकरणाने आणखी एक नवे वळण घेतले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संदीप बेडसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.पीडब्ल्युडीमधल्या त्यांच्या मूळ विभागात म्हणजे सेक्शन इंजिनीअर पदावर ते पुन्हा रुजू होणार आहेत. संदीप बेडसे यांचे संबंध लाचखोर सतीश चिखलीकर यांच्याशी असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही सोमय्यांनी केली. दरम्यान, लाचखोर अभियंता जगदीश वाघ यांच्या सगळ्या लॉकर्समधून मंगळवारी 1 कोटी 13 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या तपासात त्यांच्याकडून एकूण 2 कोटी 22 लाख रूपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. त्याशिवाय सोमवारी दिवसभरात चिखलीकर यांच्या घरातून 5 लाखाची रोकड मिळाली. आतापर्यंतची चिखलीकरांची मालमत्ता 17 कोटी 60 लाख 90 हजार रूपयांची झाली. तब्येतीच्या कारणावरून हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर काल चिखलीकर आणि वाघ या दोघांच्याही घरी तपासाला सुरूवात झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 11:54 AM IST

भुजबळांचे सहाय्यक बेडसेंची तडकाफडकी बदली

नाशिक 15 मे : सार्वजनिक बांधकाम खात्यातील लाचखोर प्रकरणामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडालीय. लाचखोर अधिकार्‍यांकडे कोट्यावधींची संपत्ती सापडली आहे. आता या प्रकरणाने आणखी एक नवे वळण घेतले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संदीप बेडसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.पीडब्ल्युडीमधल्या त्यांच्या मूळ विभागात म्हणजे सेक्शन इंजिनीअर पदावर ते पुन्हा रुजू होणार आहेत.

संदीप बेडसे यांचे संबंध लाचखोर सतीश चिखलीकर यांच्याशी असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही सोमय्यांनी केली.

दरम्यान, लाचखोर अभियंता जगदीश वाघ यांच्या सगळ्या लॉकर्समधून मंगळवारी 1 कोटी 13 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या तपासात त्यांच्याकडून एकूण 2 कोटी 22 लाख रूपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. त्याशिवाय सोमवारी दिवसभरात चिखलीकर यांच्या घरातून 5 लाखाची रोकड मिळाली.

आतापर्यंतची चिखलीकरांची मालमत्ता 17 कोटी 60 लाख 90 हजार रूपयांची झाली. तब्येतीच्या कारणावरून हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर काल चिखलीकर आणि वाघ या दोघांच्याही घरी तपासाला सुरूवात झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2013 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close