S M L

अंकितची कबुली, श्रीसंतची 'नौटंकी' सुरू

नवी दिल्ली 17 मे : आयपील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या खेळाडूंची आणि सट्टेबाजांची चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असताना अंकित चव्हाणला रडू कोसळलं. प्रलोभन दाखवल्यामुळे हातून घोडचूक झाली अशी कबुली त्यानं दिली असं दिल्ली पोलिसांमधल्या सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, अजूनही तो स्पष्ट काही सांगत नाही. पण श्रीसंतने मात्र एका मलयाळम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपण निरपराध असल्याचा दावा केला. श्रीसंतनं आपल्या करण्यात आलेला गुन्हा नाकारला. आता त्याला ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावे दाखवून पुन्हा त्याची चौकशी करण्यात येणार आहे. तो उद्या जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. आज त्याचे वकील दीपक प्रकाश यांनी त्याची भेट घेतली.स्पॉट फिक्सिंगसाठी 'ललनां'चा वापर स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीमध्ये सतत नवीन खुलासे होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सट्टेबाजांकडून या खेळाडूंना अनेक प्रलोभनं दाखवण्यात येत असत. या खेळाडूंना पैशांबरोबरच दारू आणि मुलीही पुरवल्या जात असत असं सूत्रांनी सांगितलं आहे. खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी ही प्रलोभनं रोज दाखवली जात असल्याचं कळतंय. या प्रकरणी अजून 10 सट्टेबाजांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. तसंच स्पॉट फिक्सिंगमध्ये आणखीही काहीजण गुंतले असल्याचा पोलिसांना संशय आहे. यापूर्वीच्या आयपीएल सामन्यांमध्येही फिक्सिंग झाल्याचा पोलिसांना संशय आहे. आधीच्या मॅचेसमध्येही अजित चंडिलानं फिक्सिंग केलं असावं असा संशय आहे. दरम्यान, बेटिंगचा तपास करण्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या पश्चिम पट्‌ट्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. तसंच, मुंबईसह अनेक शहरांमध्ये पोलिसांनी सट्टेबाजांवर छापे टाकायला सुरुवात केली आहे. अजित चंडिलाने अगोदरही केलं स्पॉट फिक्सिंग ?आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या खेळाडूंपैकी अजित चंडिला हा यापूर्वीच्या आयपीएल हंगामांमध्येही स्पॉट फिक्सिंगमध्ये गुंतलेला असावा असं संशय पोलिसांना आहे. अटक करण्यात आलेले श्रीसंत, अंकित चव्हाण आणि चंडिला या तीन खेळाडूंना काल पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी सुरू आहे. या खेळाडूंपैकी श्रीसंतला इतर दोघांपेक्षा वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2013 09:34 AM IST

अंकितची कबुली, श्रीसंतची 'नौटंकी' सुरू

नवी दिल्ली 17 मे : आयपील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या खेळाडूंची आणि सट्टेबाजांची चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असताना अंकित चव्हाणला रडू कोसळलं. प्रलोभन दाखवल्यामुळे हातून घोडचूक झाली अशी कबुली त्यानं दिली असं दिल्ली पोलिसांमधल्या सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, अजूनही तो स्पष्ट काही सांगत नाही. पण श्रीसंतने मात्र एका मलयाळम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपण निरपराध असल्याचा दावा केला. श्रीसंतनं आपल्या करण्यात आलेला गुन्हा नाकारला. आता त्याला ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावे दाखवून पुन्हा त्याची चौकशी करण्यात येणार आहे. तो उद्या जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. आज त्याचे वकील दीपक प्रकाश यांनी त्याची भेट घेतली.

स्पॉट फिक्सिंगसाठी 'ललनां'चा वापर

स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीमध्ये सतत नवीन खुलासे होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सट्टेबाजांकडून या खेळाडूंना अनेक प्रलोभनं दाखवण्यात येत असत. या खेळाडूंना पैशांबरोबरच दारू आणि मुलीही पुरवल्या जात असत असं सूत्रांनी सांगितलं आहे. खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी ही प्रलोभनं रोज दाखवली जात असल्याचं कळतंय. या प्रकरणी अजून 10 सट्टेबाजांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. तसंच स्पॉट फिक्सिंगमध्ये आणखीही काहीजण गुंतले असल्याचा पोलिसांना संशय आहे. यापूर्वीच्या आयपीएल सामन्यांमध्येही फिक्सिंग झाल्याचा पोलिसांना संशय आहे. आधीच्या मॅचेसमध्येही अजित चंडिलानं फिक्सिंग केलं असावं असा संशय आहे. दरम्यान, बेटिंगचा तपास करण्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या पश्चिम पट्‌ट्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. तसंच, मुंबईसह अनेक शहरांमध्ये पोलिसांनी सट्टेबाजांवर छापे टाकायला सुरुवात केली आहे.

अजित चंडिलाने अगोदरही केलं स्पॉट फिक्सिंग ?

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या खेळाडूंपैकी अजित चंडिला हा यापूर्वीच्या आयपीएल हंगामांमध्येही स्पॉट फिक्सिंगमध्ये गुंतलेला असावा असं संशय पोलिसांना आहे. अटक करण्यात आलेले श्रीसंत, अंकित चव्हाण आणि चंडिला या तीन खेळाडूंना काल पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी सुरू आहे. या खेळाडूंपैकी श्रीसंतला इतर दोघांपेक्षा वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2013 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close