S M L

संजय दत्तची होणार येरवडा तुरुंगात रवानगी

मुंबई 17 मे : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तला आज मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगातून पुण्यात येरवडा तुरुंगात हलवलं जाण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये संजयच्या सुरक्षेसाठी तयारी करण्यात आली आहे. संजयला ऑर्थर रोड तुरुंगात बरॅक नंबर दहा मध्ये ठेवण्यात आलंय. 1993 ब्लास्ट चे आरडीएक्स उतरवल्याप्रकरणी अटक असलेला आरोपी मुस्तफा डोसा हा देखील याच बरॅकमध्ये आहे. या बरॅकच्या बाहेर एक जेल अधिकारी आणि तीन पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, दुसरी दोषी झैबुन्निसा हिची मुलगी आज टाडा कोर्टासमोर शरणागतीसाठी आणखी एका दिवसाची मुदत मागणार आहे. झैबुन्निसाच्या पायावर सूज आल्यामुळे ही सवलत मागितली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2013 09:57 AM IST

संजय दत्तची होणार येरवडा तुरुंगात रवानगी

मुंबई 17 मे : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तला आज मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगातून पुण्यात येरवडा तुरुंगात हलवलं जाण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये संजयच्या सुरक्षेसाठी तयारी करण्यात आली आहे. संजयला ऑर्थर रोड तुरुंगात बरॅक नंबर दहा मध्ये ठेवण्यात आलंय.

1993 ब्लास्ट चे आरडीएक्स उतरवल्याप्रकरणी अटक असलेला आरोपी मुस्तफा डोसा हा देखील याच बरॅकमध्ये आहे. या बरॅकच्या बाहेर एक जेल अधिकारी आणि तीन पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, दुसरी दोषी झैबुन्निसा हिची मुलगी आज टाडा कोर्टासमोर शरणागतीसाठी आणखी एका दिवसाची मुदत मागणार आहे. झैबुन्निसाच्या पायावर सूज आल्यामुळे ही सवलत मागितली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2013 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close