S M L

संजूबाबाचा येरवडा तुरूंगवास लांबणीवर ?

मुंबई 18 मे : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अभिनेता संजय दत्त शरण येऊन छत्तीस तास उलटले. तरीही तो अजूनही मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगातच आहे. माझ्या जीवाला धोका आहे, मला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे मला आर्थर रोड जेलमध्ये मला ठेवू नये अशी विनंती संजय दत्तने कोर्टाला केली होती. यासंदर्भात आर्थर रोडमध्ये एक धमकी पत्रही सापडलं होतं. मात्र कोर्टात शरण आल्यानंतर त्याला येरवडा जेलमध्ये हलवण्यात येणार होतं. पण दोन दिवस उलटले अजूनही संजय दत्तला आर्थर रोड जेलमध्येच आहे.कसाबच्या सेलमध्ये संजूबाबा !26/11 च्या हल्ल्यात फासावर लटकवण्यात आलेला अजमल कसाबला ज्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथेच संजय दत्तला ठेवण्यात आलं आहे. मला कसाबच्या सेलमधून दूसर्‍या सेलमध्ये दाखल करावं अशी मागणी संजय दत्तच्या वकिलांनी टाडा कोर्टात विनंती केली आहे. दोन दिवसांपुर्वी संजय दत्त टाडा कोर्टाला शरण आला होता. कोर्टात शरण आल्यानंतर संजय दत्तला त्याच दिवशी आर्थर रोड तुरूंगात हलवण्यात आलं. त्याला पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये नेलं जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. येरवडा तुरूंगात संजयच्या सुरक्षेसंबंधात सर्व तयारीही करण्यात आली आहे. मात्र, आता संजय दत्त याला येरवडा जेलमध्ये ठेवण्याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2013 09:26 AM IST

संजूबाबाचा येरवडा तुरूंगवास लांबणीवर ?

मुंबई 18 मे : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अभिनेता संजय दत्त शरण येऊन छत्तीस तास उलटले. तरीही तो अजूनही मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगातच आहे. माझ्या जीवाला धोका आहे, मला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे मला आर्थर रोड जेलमध्ये मला ठेवू नये अशी विनंती संजय दत्तने कोर्टाला केली होती. यासंदर्भात आर्थर रोडमध्ये एक धमकी पत्रही सापडलं होतं. मात्र कोर्टात शरण आल्यानंतर त्याला येरवडा जेलमध्ये हलवण्यात येणार होतं. पण दोन दिवस उलटले अजूनही संजय दत्तला आर्थर रोड जेलमध्येच आहे.

कसाबच्या सेलमध्ये संजूबाबा !

26/11 च्या हल्ल्यात फासावर लटकवण्यात आलेला अजमल कसाबला ज्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथेच संजय दत्तला ठेवण्यात आलं आहे. मला कसाबच्या सेलमधून दूसर्‍या सेलमध्ये दाखल करावं अशी मागणी संजय दत्तच्या वकिलांनी टाडा कोर्टात विनंती केली आहे. दोन दिवसांपुर्वी संजय दत्त टाडा कोर्टाला शरण आला होता.

कोर्टात शरण आल्यानंतर संजय दत्तला त्याच दिवशी आर्थर रोड तुरूंगात हलवण्यात आलं. त्याला पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये नेलं जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. येरवडा तुरूंगात संजयच्या सुरक्षेसंबंधात सर्व तयारीही करण्यात आली आहे. मात्र, आता संजय दत्त याला येरवडा जेलमध्ये ठेवण्याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2013 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close