S M L

पंढरपूरमध्ये दलित वस्तीवर हल्ला, 15 जखमी

पंढरपूर 18 मे : येथील अजनसोंड नावाच्या गावातल्या दलित वस्तीवर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात 15 जणांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये महिला आणि वृद्धांनाही मारहाण झालीय. या हल्ल्यातील 15 जखमींना पंढरपूरच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 संशियत हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. पण हा हल्ला कुणी केला हे अजून समजू शकलेलं नाही. गावातल्या चौकाला नाव देण्यावरून हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून पीडित कुटुबीयांना प्रत्येकी 1 लाखाची मदत जाहीर करण्यात आलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2013 10:56 AM IST

पंढरपूरमध्ये दलित वस्तीवर हल्ला, 15 जखमी

पंढरपूर 18 मे : येथील अजनसोंड नावाच्या गावातल्या दलित वस्तीवर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात 15 जणांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये महिला आणि वृद्धांनाही मारहाण झालीय. या हल्ल्यातील 15 जखमींना पंढरपूरच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 संशियत हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. पण हा हल्ला कुणी केला हे अजून समजू शकलेलं नाही. गावातल्या चौकाला नाव देण्यावरून हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून पीडित कुटुबीयांना प्रत्येकी 1 लाखाची मदत जाहीर करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2013 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close