S M L

मुख्यमंत्र्यांना दाखवले दुष्काळग्रस्तांनी काळे झेंडे

सोलापूर 18 मे : उजनी धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी न सोडल्याच्या निषेधार्थ आज दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काळे झेंडे दाखवले. सोलापूर जिल्ह्यात नांदणी येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत आरटीओ चेकपोस्टचे उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी सभामंडपात उपस्थित शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी घोषणाबाजी करीत पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानंतर लगेच पोलिसांनी आंदोलकर्त्यांना ताब्यात घेतलं. मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या शंभर दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांचं धरणे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी कॅनॉल लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या समोर हे आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2013 10:41 AM IST

मुख्यमंत्र्यांना दाखवले दुष्काळग्रस्तांनी काळे झेंडे

सोलापूर 18 मे : उजनी धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी न सोडल्याच्या निषेधार्थ आज दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काळे झेंडे दाखवले. सोलापूर जिल्ह्यात नांदणी येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत आरटीओ चेकपोस्टचे उद्घाटन करण्यात आलं.

त्यावेळी सभामंडपात उपस्थित शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी घोषणाबाजी करीत पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानंतर लगेच पोलिसांनी आंदोलकर्त्यांना ताब्यात घेतलं. मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या शंभर दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांचं धरणे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी कॅनॉल लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या समोर हे आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2013 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close