S M L

फिक्सर खेळाडूंभोवती कारवाईचा फास आवळला !

मुंबई 18 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी फिक्सर खेळाडू विरोधात कारवाईचा फास आणखी आवळला आहे. आज मुंबई पोलिसांने तीन बुकींना अटक केली. रमेश व्यास असं यापैकी एका बुकीचं नाव असून पाकिस्तानमध्येही रमेश व्यासचा संपर्क होती अशी माहिती पोलीस सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी दिली. या बुकींकडून 92 मोबाईल, लॅपटॉप आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान एस श्रीशांतविरुद्ध भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत असा दावा रॉय यांनी केला. तर उद्या बीसीसीआय वर्किंग कमिटीची महत्वाची बैठक होतेय. खेळाडू दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला यांनी दिला आहे. क्रिकेट जगतला हादरावून सोडणार आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचे दिवसेंदिवस नव नवीन धक्कादायक खुलासे समोर येतं आहे. आज मुंबई पोलिसांनी तीन बुकींना अटक के ली आहे. या कारवाईत धक्कादायक माहिती हाती लागली आहे. रमेश व्यास नावाच बुकीला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडून 92 मोबाईल, लॅपटॉप आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर मुंबईत एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एस श्रीशांत आणि त्याचा मित्र जिजू जनार्दन यांच्या नावे रुम्स बुक होत्या. यापैकी श्रीसंतच्या नावे बुक असलेल्या रुममधून लॅपटॉप, आयपॅड आणि एक डायरी जप्त करण्यात आली आहे. तर श्रीसंतचा मित्र आणि बुकी जिजू जनार्दन याच्या रुममधूनही लॅपटॉप जप्त करण्यात आला. याशिवाय, या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करत असून खेळाडूंना कोण कोण भेटायला आलेलं होतं, हे स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी रमेश व्यासला 14 मे रोजी काळबादेवी परिसरातून अटक करण्यात आली होती.पोलिसांची कारवाई- श्रीसंत आणि जीजू जनार्दन राहणार्‍या हॉटेलवर मुंबई क्राईम ब्रांचचे छापे- श्रीसंतचे लॅपटॉप, आयपॅड, फोन आणि रोकड केली जप्त- श्रीसंतच्या रूममधून 72 हजार रुपये आणि डायरी केली जप्त- डायरीत इंग्रजी आणि मल्याळण भाषेत नोंदी- मुंबई पोलिसांनुसार राजस्थानची संपूर्ण टीम राहत असणार्‍या हॉटेलमध्ये श्रीसंत राहत नव्हता- दिल्ली पोलिसांकडे श्रीसंतविरोधात भक्कम पुरावे- दिल्ली पोलिसांनुसार श्रीसंतला 40 लाखांपैकी 10 लाख रुपये मिळाले क्रिकेटपटू एस श्रीसंत आणि बुकी जिजू जनार्दन वांद्रे बीकेसी इथल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिले होते, याच हॉटेलमधून त्यांनी सट्टेबाजांसाठी काम केल्याचं संशय आहे. श्रीसंत आणि जनार्दन यांच्या रुममधून अनेक महत्वाचं साहित्य क्राईम ब्रँचनं जप्त केलंय. अजित चंडिलाने IPL च्या 5 व्या हंगामातही केलं फिक्सिंग ! स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेला राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अजित चंडिलाने आयपीएलच्या पाचव्या हंगामातही फिक्सिंग केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला. याची तपासणी करण्यासाठी दिल्ली पोलीस आता या खेळाडूंचे व्हॉईस सॅम्पल्स फॉरेनसिक तपासणीसाठी पाठवणार आहेत. पोलिसांनी अजित चंडिलाच्या फरीदाबादमधील घरी जाऊनही चौकशी केल्याचं कळतंय. या हंगामाप्रमाणेच गेल्या हंगामातही खेळाडू-अंडरवर्ल्ड आणि बुकी हे त्रिकूट कार्यरत होतं का याची चौकशीही दिल्ली पोलीस करत आहे. दुबईमधील बुकी सुनील अभिचंदानीनं 2009 मध्ये खेळाडूंना संपर्क केला होता अशी माहितीही मिळतेय. यावरुन पोलीस आता पुढील तपास करत आहेत. हॉग, कुपर आणि त्रिवेदीने सट्टेबाजांची ऑफर धुडकावलीआयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आणखी काही क्रिकेटपटू गुंतले असण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्सचे एस श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्याशिवाय राजस्थानचे ब्रॅड हॉग, केव्हीन कुपर आणि सिद्धार्थ त्रिवेदी यांच्याशीही सट्टेबाजांनी संपर्क साधल्याचं उघड झालं आहे. पण या तिघांनी सट्टेबाजांची ऑफर धुडावून लावल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2013 03:02 PM IST

फिक्सर खेळाडूंभोवती कारवाईचा फास आवळला !

मुंबई 18 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी फिक्सर खेळाडू विरोधात कारवाईचा फास आणखी आवळला आहे. आज मुंबई पोलिसांने तीन बुकींना अटक केली. रमेश व्यास असं यापैकी एका बुकीचं नाव असून पाकिस्तानमध्येही रमेश व्यासचा संपर्क होती अशी माहिती पोलीस सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी दिली. या बुकींकडून 92 मोबाईल, लॅपटॉप आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान एस श्रीशांतविरुद्ध भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत असा दावा रॉय यांनी केला. तर उद्या बीसीसीआय वर्किंग कमिटीची महत्वाची बैठक होतेय. खेळाडू दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला यांनी दिला आहे. क्रिकेट जगतला हादरावून सोडणार आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचे दिवसेंदिवस नव नवीन धक्कादायक खुलासे समोर येतं आहे. आज मुंबई पोलिसांनी तीन बुकींना अटक के ली आहे. या कारवाईत धक्कादायक माहिती हाती लागली आहे. रमेश व्यास नावाच बुकीला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडून 92 मोबाईल, लॅपटॉप आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

तर मुंबईत एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एस श्रीशांत आणि त्याचा मित्र जिजू जनार्दन यांच्या नावे रुम्स बुक होत्या. यापैकी श्रीसंतच्या नावे बुक असलेल्या रुममधून लॅपटॉप, आयपॅड आणि एक डायरी जप्त करण्यात आली आहे. तर श्रीसंतचा मित्र आणि बुकी जिजू जनार्दन याच्या रुममधूनही लॅपटॉप जप्त करण्यात आला. याशिवाय, या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करत असून खेळाडूंना कोण कोण भेटायला आलेलं होतं, हे स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी रमेश व्यासला 14 मे रोजी काळबादेवी परिसरातून अटक करण्यात आली होती.

पोलिसांची कारवाई- श्रीसंत आणि जीजू जनार्दन राहणार्‍या हॉटेलवर मुंबई क्राईम ब्रांचचे छापे- श्रीसंतचे लॅपटॉप, आयपॅड, फोन आणि रोकड केली जप्त- श्रीसंतच्या रूममधून 72 हजार रुपये आणि डायरी केली जप्त- डायरीत इंग्रजी आणि मल्याळण भाषेत नोंदी- मुंबई पोलिसांनुसार राजस्थानची संपूर्ण टीम राहत असणार्‍या हॉटेलमध्ये श्रीसंत राहत नव्हता- दिल्ली पोलिसांकडे श्रीसंतविरोधात भक्कम पुरावे- दिल्ली पोलिसांनुसार श्रीसंतला 40 लाखांपैकी 10 लाख रुपये मिळाले

क्रिकेटपटू एस श्रीसंत आणि बुकी जिजू जनार्दन वांद्रे बीकेसी इथल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिले होते, याच हॉटेलमधून त्यांनी सट्टेबाजांसाठी काम केल्याचं संशय आहे. श्रीसंत आणि जनार्दन यांच्या रुममधून अनेक महत्वाचं साहित्य क्राईम ब्रँचनं जप्त केलंय.

अजित चंडिलाने IPL च्या 5 व्या हंगामातही केलं फिक्सिंग !

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेला राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अजित चंडिलाने आयपीएलच्या पाचव्या हंगामातही फिक्सिंग केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला. याची तपासणी करण्यासाठी दिल्ली पोलीस आता या खेळाडूंचे व्हॉईस सॅम्पल्स फॉरेनसिक तपासणीसाठी पाठवणार आहेत.

पोलिसांनी अजित चंडिलाच्या फरीदाबादमधील घरी जाऊनही चौकशी केल्याचं कळतंय. या हंगामाप्रमाणेच गेल्या हंगामातही खेळाडू-अंडरवर्ल्ड आणि बुकी हे त्रिकूट कार्यरत होतं का याची चौकशीही दिल्ली पोलीस करत आहे. दुबईमधील बुकी सुनील अभिचंदानीनं 2009 मध्ये खेळाडूंना संपर्क केला होता अशी माहितीही मिळतेय. यावरुन पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

हॉग, कुपर आणि त्रिवेदीने सट्टेबाजांची ऑफर धुडकावली

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आणखी काही क्रिकेटपटू गुंतले असण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्सचे एस श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्याशिवाय राजस्थानचे ब्रॅड हॉग, केव्हीन कुपर आणि सिद्धार्थ त्रिवेदी यांच्याशीही सट्टेबाजांनी संपर्क साधल्याचं उघड झालं आहे. पण या तिघांनी सट्टेबाजांची ऑफर धुडावून लावल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2013 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close