S M L

कास्टिंग डिरेक्टरने पाठवले होते श्रीसंतला मॉडेलचे फोटो !

नवी दिल्ली 20 मे: आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या तपासातून नव-नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येतं आहे. बॉलिवूडच्या कास्टिंग डिरेक्टरने श्रीसंतला मॉडेल,अभिनेत्रींचे फोटो पाठवल्याचं तपासातून पुढे आलं आहे. या कास्टिंग डिरेक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतंल आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक होण्याअगोदर श्रीसंत आपला मित्र जिजूसोबत मुंबईतील सोफिटल हॉटेलमध्ये थांबला होता. आणि ओआरजी, रॉयल्टी पबमध्ये मॉडेल आणि बुकींसोबत भेट झाली होती.मुंबई पोलिसांनी सोफिटेल हॉटेल, ओआरजी आणि रॉयल्टी पबमधून सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. सोफिटल हॉटेलमधून श्रीसंतचा लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला. या लॅपटॉपमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या आहे. तसंच बॉलिवूडचे कास्टिंग काऊचने ईमेलद्वारे मॉडेलची फोटो पाठवलेत. ज्या कॉस्टिंग डिरेक्टरने फोटो पाठवले होते त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याने काही बॉलिवूडच्या अभिनेत्रींचे फोटोही पाठवल्याचं तपासातून पुढे येत आहे. लॅपटॉपमध्ये बुकी ज्यूपिटरसोबतचे श्रीसंतचा फोटोही सापडलाय. मात्र लॅपटॉपमधून ईमेल डिलीट करण्यात आले आहे. या ईमेलच्या द्वारे श्रीसंत आणि बुकी संवाद साधत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे सायबर क्राईमची टीम डिलीट केलेले ईमेल पुन्हा रिट्रीव करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसंच लॅपटॉपमध्ये श्रीसंतने सांकेतिक शब्दात फोल्डर तयार केली होती. यामध्ये सांकेतीक शब्दात फोन नंबर सेव्ह करण्यात आली आहे. हे कोड काय आहे याचा तपास पोलीस करत आहे. औरंगाबादमधून 3 जणांना अटकआयपीेएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शनही उघड झालंय. काल औरंगाबामधून 3 जणांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. सुनील भाटिया, किरण डोळे आणि मनीष गंुडेवार अशी अटक झालेल्या बुकींची नावं आहेत. यातला मनीष गुंडेवार माजी रणजीपटू आहे. या तिन्ही बुकींना 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. स्पॉट फिक्सिंगची पाळंमुळं खोलवर रुजली असून महाराष्ट्रातील काही बडी नावंही यात गुंतली असल्याचा खुलासा दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी केला. अजित चंडिलाच्या घरावर छापा 20 लाखाची रोकड सापडलीबीसीसीआयच्या अँटी करप्शनच्या युनिटचे प्रमुख रवी सवानी यांनी आज दिल्ली पोलीस अधिकार्‍यंाची भेट घेतली. दिल्ली पोलिसांनी अजित चंडिलाच्या फरिदाबाद मधल्या नातेवाईकांच्या घरातून तब्बल 20 लाख रुपये जप्त केले. तसंच पोलीस कोठडीत असलेल्या तीन्ही क्रिकेटर्सच्या आवाजाचे नमुनेही पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे अधिक तपासणीसाठी पाठवले आहेत. या पार्श्वभुमीवर रवी सवानी यांची भेट महत्वपूर्ण मानली जातेय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2013 02:03 PM IST

कास्टिंग डिरेक्टरने पाठवले होते श्रीसंतला मॉडेलचे फोटो !

नवी दिल्ली 20 मे: आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या तपासातून नव-नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येतं आहे. बॉलिवूडच्या कास्टिंग डिरेक्टरने श्रीसंतला मॉडेल,अभिनेत्रींचे फोटो पाठवल्याचं तपासातून पुढे आलं आहे. या कास्टिंग डिरेक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतंल आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक होण्याअगोदर श्रीसंत आपला मित्र जिजूसोबत मुंबईतील सोफिटल हॉटेलमध्ये थांबला होता. आणि ओआरजी, रॉयल्टी पबमध्ये मॉडेल आणि बुकींसोबत भेट झाली होती.मुंबई पोलिसांनी सोफिटेल हॉटेल, ओआरजी आणि रॉयल्टी पबमधून सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे.

सोफिटल हॉटेलमधून श्रीसंतचा लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला. या लॅपटॉपमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या आहे. तसंच बॉलिवूडचे कास्टिंग काऊचने ईमेलद्वारे मॉडेलची फोटो पाठवलेत. ज्या कॉस्टिंग डिरेक्टरने फोटो पाठवले होते त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याने काही बॉलिवूडच्या अभिनेत्रींचे फोटोही पाठवल्याचं तपासातून पुढे येत आहे.

लॅपटॉपमध्ये बुकी ज्यूपिटरसोबतचे श्रीसंतचा फोटोही सापडलाय. मात्र लॅपटॉपमधून ईमेल डिलीट करण्यात आले आहे. या ईमेलच्या द्वारे श्रीसंत आणि बुकी संवाद साधत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे सायबर क्राईमची टीम डिलीट केलेले ईमेल पुन्हा रिट्रीव करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसंच लॅपटॉपमध्ये श्रीसंतने सांकेतिक शब्दात फोल्डर तयार केली होती. यामध्ये सांकेतीक शब्दात फोन नंबर सेव्ह करण्यात आली आहे. हे कोड काय आहे याचा तपास पोलीस करत आहे.

औरंगाबादमधून 3 जणांना अटकआयपीेएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शनही उघड झालंय. काल औरंगाबामधून 3 जणांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. सुनील भाटिया, किरण डोळे आणि मनीष गंुडेवार अशी अटक झालेल्या बुकींची नावं आहेत. यातला मनीष गुंडेवार माजी रणजीपटू आहे. या तिन्ही बुकींना 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. स्पॉट फिक्सिंगची पाळंमुळं खोलवर रुजली असून महाराष्ट्रातील काही बडी नावंही यात गुंतली असल्याचा खुलासा दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी केला.

अजित चंडिलाच्या घरावर छापा 20 लाखाची रोकड सापडलीबीसीसीआयच्या अँटी करप्शनच्या युनिटचे प्रमुख रवी सवानी यांनी आज दिल्ली पोलीस अधिकार्‍यंाची भेट घेतली. दिल्ली पोलिसांनी अजित चंडिलाच्या फरिदाबाद मधल्या नातेवाईकांच्या घरातून तब्बल 20 लाख रुपये जप्त केले. तसंच पोलीस कोठडीत असलेल्या तीन्ही क्रिकेटर्सच्या आवाजाचे नमुनेही पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे अधिक तपासणीसाठी पाठवले आहेत. या पार्श्वभुमीवर रवी सवानी यांची भेट महत्वपूर्ण मानली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2013 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close