S M L

सुपर मॅक्स कंपनीने 1200 कामगारांना नोकरीवरून काढलं

ठाणे 20 मे : येथील वागळे इस्टेट परिसरात असणार्‍या सुपर मॅक्स कंपनीमधील कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या 1200 कर्मचार्‍यांना कंपनीने अचानक कामावरुन काढलं. कंपनीकडून अचानक झालेल्या या कपातीमुळे कर्मचार्‍यांना एकच हादरा बसला. संतप्त कामगार आणि कंपनीच्या अधिकार्‍यांमध्ये कामगार उपायुक्त कार्यालयाबाहेर वाद झाला. यावेळी कर्मचार्‍यांनी सुपर मॅक्स कंपनीची गाडी फोडली आणि ड्रायव्हरलाही मारहाण केली. या प्रकारानंतर कंपनीच्या खाजगी सुरक्षा रक्षकांनी कर्मचार्‍यांना मारहाण केली. या मारहाणीत एका महिलेला गंभीर दुखापत झाली. या महिलेवर ठाण्याच्या शासकीय रूग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ठाणे पोलिसांनी याप्रकारानंतर कर्मचार्‍यांना ताब्यात घेतलं असून कामगारांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2013 03:30 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2013 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close