S M L

सत्यम पुन्हा उभी राहील : मैनापती

8 जानेवारीसंपूर्ण कॉर्पोरेट विश्वाला हादरवून टाणार्‍या सत्यम च्या घोटाळ्यानंतर अखेर सत्यमच्या संचालकांनी आपलं मौन सोडलं आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली बाजू मांडली. अडचणींवर मात करून सत्यमचा बइझनेस सुरू ठेवणं हे आमचं पाथमिक उद्दिष्ट असल्याचं सत्यमचे प्रभारी सीईओ मैनापती यांनी स्पष्ट केलं. सत्यमचे सात टॉपमोस्ट अधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. या घोटाळ्याचे सूत्रधार रामलिंग राजू मात्र या पत्रकार परिषदेस उपस्थित नव्हते.सत्यमसंबंधी सगळ्या शंका कुशंकाना उत्तर द्यायचा प्रयत्न मैनापती यांनी केला. सत्यममध्ये झालेला घोटाळा त्यांनी मान्य केला, मात्र कंपनी बंद पडू दिली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. "आम्ही सतत आमच्या कस्टमर्सच्या संपर्कात आहोत. त्यांनी आम्हाला मदतीचं पूर्ण आश्वासन दिलं आहे. कर्मचारी आणि शेअरहोल्डर्सच्या हिताला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देऊ" असं ते म्हणाले. "कर्मचार्‍यांचं मनोबल परत उभारणं आमचं काम आहे. यानंतर कस्टमर्सशी संवाद साधणं आणि आर्थिक स्थिती सावरणं ही आमची उद्दिष्ट आहेत " असं मैनापती म्हणाले. आर्थिक घोटाळयातून बाहेर पडण्यासाठी उपायांची यादीच त्यांनी जाहीर केली. कंपनीच्या चार संचालकांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. आता संपूर्ण घोटाळ्याची यौकशी सरकारकडून करून घेण्यात येणार आहे. कपनीचं प्राईस वॉटर ऑडिट होईल, तसंच आयसीएनं कंपनी ऑडिटर्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. "नवीन बोर्ड मेम्बर शोधण्यासाठी आम्ही कॉर्पोरेट जाएंट्सच्या संपर्कात असून लौकरच योग्य बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नियुक्त केले जातील" अशी माहिती मैनापती यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2009 12:04 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2009 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close