S M L

फ्रायडे रिलीज

8 जानेवारी, मुंबई शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर चलती आहे ती हॉलिवुडची. कारण शुक्रवारी रिलीज होतायत तीन हॉलिवुड सिनेमा रिलीज होत आहेत. मसाला बॉलिवुड सिनेमासाठी शुक्रवारपर्यंत वाट बघावी लागणार आहे. 16 जानेवारीला ' चांदनी चौक टू चायना ' हा सिनेमा रिलीज होईल. तीन हॉलिवुड सिनेमांबरोबरीनं एक मराठी आणि एक बॉलिवुडपट रिलीज होत आहे. ' गाव तसं चांगलं ' हा मराठी सिनेमा रिलीज होत आहे. तब्बल 12 वर्षांनी निळू फुले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्याबरोबर सदाशिव अमरापूरकर, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव हे कलाकारही आहेत. एका इरसाल गावाला एक ध्येयवादी शिक्षक कसा वठणीवर आणतो, अशी ही कथा आहे. सिनेमाचं आणखी एक आकर्षण म्हणजे आशा भोसलेंच्या आवाजातली लावणी. बॉलिवुड सिनेमांपैकी प्रेसिडेंट इज कमिंग हा विडंबनात्मक सिनेमा आहे. जॉर्ज बुश यांची राजवट संपत आली असतानाच, त्यांच्यावरचा हा सिनेमा रिलीज होतोय. मुख्य म्हणजे टु के डिजिटल फॉमॅटमध्ये रिलीज होणारा हा पहिलाच सिनेमा आहे. कोंकना सेन मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्याबरोबर सहा नवे चेहरे दिसणार आहेत. दिग्दर्शन आहे कुणाल रॉय कपूरचं आहे. या आठवड्यात रिलिज होणा-या तीन हॉलिवुडपटांपैकी ' मिट बिल ' हा एक विनोदी सिनेमा आहे. मिट बिल नावाचा तरुण आपल्या सासर्‍यासाठी काम करत असतो. त्यात त्याला कसलाच इंटरेस्ट नसतो. त्यामुळेतो खूप बोअर झाला आहे. एक दिवस त्याला यातून बाहेर पडायचा मार्ग त्याला मिळतो, ही या सिनेमाची कथा आहे. अ‍ॅलोना एच्खार्ट, एलिझाबेथ बँक्स्, जेसिका अल्बा हे कलाकार या सिनेमात आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन बर्नि गोल्डमन आणि मेलिसा वॉल्कीक यांनी केलं आहे. ' इगोर ' हा एक अ‍ॅनिमेशनपट आहे. मलेरिया नावाच्या गावातल्या शास्त्रज्ञांची वाईट कामगिरी करण्याची स्पर्धा लागलीय आणि ते सगळं उद्‌ध्वस्त करत सुटले आहेत. एका शास्त्रज्ञाच्या घरी इगोर नावाचा नोकर आहे. त्यालाही यात भाग घ्यायचाय, पण तो काही करू शकत नाही, या कथानका भोवती ' इगोर ' हा अ‍ॅनिमेशन पट फिरतो. ' ब्लाइंडनेस ' हा सिनेमा एका पोर्तुगीज कादंबरीवर बेतला आहे. एका गावात अचानक सगळेजण आंधळे व्हायला लागतात. हा रोग संसर्गजन्य असतो, त्यामुळे या सर्व लोकांना एका तुरुंगात डांबतात आणि वाईट वागणूक देतात. अशावेळी एका आय स्पेशालिस्टची बायको सगळ्यांना योग्य मार्ग दाखवते, अशी कथा आहे. मुख्य भूमिकेत आहे ज्युलियन मूर आहे. एकूणच या वीकेण्डला हॉलिवुड सिनेमाला पर्याय चांगले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2009 01:40 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2009 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close