S M L
  • तरूणींनी केली रोमिओची यथेच्छ धुलाई

    Published On: May 30, 2013 11:18 AM IST | Updated On: May 30, 2013 11:18 AM IST

    मुंबई 30 मे : मोबाईल फोनवर महिलांशी अश्लिल संभाषण करणार्‍या रोडरोमिओला दोन रणरागिणींनी कुर्ला स्थानकात भर दुपारी यथेच्छ चोप दिलाय. मिखीलेश तिवारी असं या रोडरोमिओचं नाव नाव आहे. तो महिलांना मोबाईलवर कॉल करुन आपल्याला भेटायचं आहे, असं सांगत असे. या महिलांनी हिंमत दाखवत मिखीलेशला नेहमी गर्दीने हाऊसफूल असणार्‍या कुर्ला स्थानकावर बोलावलं आणि चोप दिला. स्थानकावर प्रवाशांनी याचा मनमुराद आनंद घेतला. अखेर एका तरूणांने मध्यस्थी करून रोडरोमिओला कुर्ला रेल्वे पोलिसांच्या हवाली केलंय. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close