S M L

फिक्सिंगमध्ये आणखी 2 टीमचा सहभाग ?

नवी दिल्ली 23 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची व्याप्ती आता अधिकच वाढलीय. दिल्ली पोलीस आयुक्त नीरजकुमार यांनी या प्रकरणांमध्ये राजस्थान रॉयल व्यतिरीक्त अजून दोन टीम्स सामील असल्याची माहिती दिलीय. मात्र त्या टीम्सची नावं सांगायला मात्र नकार दिला. फिक्सिंगच्या प्रकरणात अद्याप तरी दाऊद इब्राहिम गँगमधील कोणाचंही नाव ठळकपणे समोर आलं नसल्याचही नीरजकुमारांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, दिल्ली पोलिसांना श्रीसंत राहिलेल्या हॉटेलमध्ये सापडलेल्या वस्तूंची तपासणी करायची आहे आणि त्याच्या परवानगीसाठी दिल्ली पोलीस न्यायालयात जाणार आहेत. तर अभिनेता विंदू दारा सिंगनं पोलीस चौकशीत आणखीही काही महत्त्वाची माहिती दिल्याचं सूत्रांकडून समजतंय. त्यानं आपण तीन खेळाडूंच्या सतत संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. तसंच बॉलीवूडमधल्या काही कलाकारांतर्फे आपण सट्टा लावत असल्याचंही त्यांने कबूल केलं आहे. मुंबई पोलिसांनी विंदू दारा सिंग याच्या घरी छापा टाकल्याची माहिती आहे. त्याच्या घरातून लॅपटॉप आणि पैसे जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुंबई-चेन्नई दरम्यानच्या मॅचमध्ये विंदू साक्षी धोणीबरोबर मॅच पाहत होता. मुळात विंदू चेन्नई सुपर किंग्जच्या व्हीआयपी बॉक्समध्ये कसा पोहचला, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. दरम्यान, आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये प्रशासन किंवा खेळाडूंपैकी कोणीही कितीही मोठी माणसं गुंतलेली असली तरी, त्यांना शिक्षा केली जाईल, अशी ग्वाही आयपीएलचे कमिशनर राजीव शुक्ला यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2013 09:03 AM IST

फिक्सिंगमध्ये आणखी 2 टीमचा सहभाग ?

नवी दिल्ली 23 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची व्याप्ती आता अधिकच वाढलीय. दिल्ली पोलीस आयुक्त नीरजकुमार यांनी या प्रकरणांमध्ये राजस्थान रॉयल व्यतिरीक्त अजून दोन टीम्स सामील असल्याची माहिती दिलीय. मात्र त्या टीम्सची नावं सांगायला मात्र नकार दिला.

फिक्सिंगच्या प्रकरणात अद्याप तरी दाऊद इब्राहिम गँगमधील कोणाचंही नाव ठळकपणे समोर आलं नसल्याचही नीरजकुमारांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, दिल्ली पोलिसांना श्रीसंत राहिलेल्या हॉटेलमध्ये सापडलेल्या वस्तूंची तपासणी करायची आहे आणि त्याच्या परवानगीसाठी दिल्ली पोलीस न्यायालयात जाणार आहेत.

तर अभिनेता विंदू दारा सिंगनं पोलीस चौकशीत आणखीही काही महत्त्वाची माहिती दिल्याचं सूत्रांकडून समजतंय. त्यानं आपण तीन खेळाडूंच्या सतत संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. तसंच बॉलीवूडमधल्या काही कलाकारांतर्फे आपण सट्टा लावत असल्याचंही त्यांने कबूल केलं आहे. मुंबई पोलिसांनी विंदू दारा सिंग याच्या घरी छापा टाकल्याची माहिती आहे.

त्याच्या घरातून लॅपटॉप आणि पैसे जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुंबई-चेन्नई दरम्यानच्या मॅचमध्ये विंदू साक्षी धोणीबरोबर मॅच पाहत होता. मुळात विंदू चेन्नई सुपर किंग्जच्या व्हीआयपी बॉक्समध्ये कसा पोहचला, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. दरम्यान, आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये प्रशासन किंवा खेळाडूंपैकी कोणीही कितीही मोठी माणसं गुंतलेली असली तरी, त्यांना शिक्षा केली जाईल, अशी ग्वाही आयपीएलचे कमिशनर राजीव शुक्ला यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2013 09:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close