S M L

बीसीसीआयच्या अध्यक्षांच्या जावयाला समन्स

चेन्नई : आयपीएल फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावली आहे. मय्यप्पन विंदू दारा सिंग याच्या संपर्कात होते अशी विंदू दारा सिंगच्या फोन कॉल्सवरून माहिती मिळाली होती. आणि त्याचमुळे मॅच फिक्सिंगशी मय्यपन्न यांचा काही संबंध आहे का ? हे तपासण्यासाठी मुंबई पोलिसांची एक टीम चेन्नईत त्यांच्या घरी पोहोचली होती. मात्र मयप्पन हे सध्या चेन्नईत नाहीत ते उद्या तिथं पोहोचण्याची शक्यता वर्तवली जातीय. त्यामुळे पोलीस त्यांच्या घरातून बाहेर पडले आहेत. मात्र पोलिसांनी मय्यपन यांच्या घरी समन्स बजावलं आहे. तर आयपीएल स्पॉट फिक्सिंगसाठी काही खेळाडू जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं मत बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी सीएनएन आयबीएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. तिकडे आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला यांनी BCCIचे अध्यक्ष श्रीनिवासन यांची पाठराखण केली. सध्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी सुरू आहे, ती पूर्ण झाल्यालरच काही निष्कर्ष काढता येईल. आणि त्यामुळे श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचंही शुक्ला यांनी म्हटलं आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन यांचं नाव आल्यानंतर श्रीनिवासन यांच्या अडचणीत वाढ झाली. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरु लागली. पण फिक्सिंगआधीही श्रीनिवासन यांचा अध्यक्षपदाचा काळ वादांनी गाजलेला आहे. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा का?आरोप 1 - 2007 : बीसीसीआयच्या सचिवपदावर असताना आयपीएलची मालकी मिळविण्यासाठी घटनेत केला बदलआरोप 2 - 2009 : आयपीएलमध्ये फ्लिंटॉफसाठी मोर्चेबांधणीआरोप 3 - 2009 : आयपीएलमध्ये अंपायरच्या नियुक्त्या बदलल्याआरोप 4 - ए. सी. मुथ्थया यांनी श्रीनिवासन यांच्या हितसंबधांवर आक्षेप घेणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली. आरोप 5 - आयपीएल टीमची मालकी असतानाही गर्व्हनिंग कौन्सिलचे अध्यक्षपद भूषवलंआरोप 6 - बीसीसीआय आणि भारतीय चेस फेडरेशनचे एकाचवेळी अध्यक्ष. विरोधानंतर चेस फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामाआरोप 7 - बीसीसीआयचं सलग दुसर्‍यांदा अध्यक्षपद भूषवण्यासाठी घटनेत बदल केला

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2013 11:48 AM IST

बीसीसीआयच्या अध्यक्षांच्या जावयाला समन्स

चेन्नई : आयपीएल फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावली आहे. मय्यप्पन विंदू दारा सिंग याच्या संपर्कात होते अशी विंदू दारा सिंगच्या फोन कॉल्सवरून माहिती मिळाली होती. आणि त्याचमुळे मॅच फिक्सिंगशी मय्यपन्न यांचा काही संबंध आहे का ? हे तपासण्यासाठी मुंबई पोलिसांची एक टीम चेन्नईत त्यांच्या घरी पोहोचली होती.

मात्र मयप्पन हे सध्या चेन्नईत नाहीत ते उद्या तिथं पोहोचण्याची शक्यता वर्तवली जातीय. त्यामुळे पोलीस त्यांच्या घरातून बाहेर पडले आहेत. मात्र पोलिसांनी मय्यपन यांच्या घरी समन्स बजावलं आहे. तर आयपीएल स्पॉट फिक्सिंगसाठी काही खेळाडू जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं मत बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी सीएनएन आयबीएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.

तिकडे आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला यांनी BCCIचे अध्यक्ष श्रीनिवासन यांची पाठराखण केली. सध्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी सुरू आहे, ती पूर्ण झाल्यालरच काही निष्कर्ष काढता येईल. आणि त्यामुळे श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचंही शुक्ला यांनी म्हटलं आहे.

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन यांचं नाव आल्यानंतर श्रीनिवासन यांच्या अडचणीत वाढ झाली. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरु लागली. पण फिक्सिंगआधीही श्रीनिवासन यांचा अध्यक्षपदाचा काळ वादांनी गाजलेला आहे.

श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा का?

आरोप 1 - 2007 : बीसीसीआयच्या सचिवपदावर असताना आयपीएलची मालकी मिळविण्यासाठी घटनेत केला बदलआरोप 2 - 2009 : आयपीएलमध्ये फ्लिंटॉफसाठी मोर्चेबांधणीआरोप 3 - 2009 : आयपीएलमध्ये अंपायरच्या नियुक्त्या बदलल्याआरोप 4 - ए. सी. मुथ्थया यांनी श्रीनिवासन यांच्या हितसंबधांवर आक्षेप घेणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली. आरोप 5 - आयपीएल टीमची मालकी असतानाही गर्व्हनिंग कौन्सिलचे अध्यक्षपद भूषवलंआरोप 6 - बीसीसीआय आणि भारतीय चेस फेडरेशनचे एकाचवेळी अध्यक्ष. विरोधानंतर चेस फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामाआरोप 7 - बीसीसीआयचं सलग दुसर्‍यांदा अध्यक्षपद भूषवण्यासाठी घटनेत बदल केला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2013 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close