S M L

वेबकॅमसमोर तरूणीची आत्महत्या

मुंबई 23 मे : येथील विलेपार्ले भागात एका 26 वर्षीय तरूणीने प्रियकराशी वेब चॅट करत असताना वेबकॅमसमोरच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना तिचा प्रियकर वेबकॅमवर पाहत होता मात्र तिला वाचवण्यात त्याला अपयश आलं. शोभना असं या तरूणीचं नाव आहे. शोभनाचे लवकर लग्न व्हावे यासाठी तिच्या कुटुंबीयांनी स्थळ पाहण्यास सुरूवात केली होती. कुटुंबीयांनीही शोभनाने लवकर लग्न करावे अशी मागणी लावून धरली होती. बुधवारी रात्री शोभना आपल्या प्रियकरासोबत वेबकॅमेर्‍याच्या माध्यमातून चॅटिंग करत होती. काही वेळाने लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात झालं. शोभनानं रागाच्या भरात आत्महत्या करण्याची धमकी दिली. काही वेळातच तिने फॅनला ओढणी लावून गळफास घेतला. यावेळी तिच्या प्रियकराने शोभनाच्या बहिणीला फोन करून घडत असलेला प्रकार सांगितला केलं. तिची बहिणी शोभनाच्या रूमपर्यंत पोहचेपर्यंत शोभनाने गळफास लावून घेतला होता. तिला तातडीने नजीकच्या रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. दरम्यान, पोलिसांनी तरूणीचे शव शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आले आहे. तिने आत्महत्या का केली याचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2013 12:33 PM IST

वेबकॅमसमोर तरूणीची आत्महत्या

मुंबई 23 मे : येथील विलेपार्ले भागात एका 26 वर्षीय तरूणीने प्रियकराशी वेब चॅट करत असताना वेबकॅमसमोरच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना तिचा प्रियकर वेबकॅमवर पाहत होता मात्र तिला वाचवण्यात त्याला अपयश आलं.

शोभना असं या तरूणीचं नाव आहे. शोभनाचे लवकर लग्न व्हावे यासाठी तिच्या कुटुंबीयांनी स्थळ पाहण्यास सुरूवात केली होती. कुटुंबीयांनीही शोभनाने लवकर लग्न करावे अशी मागणी लावून धरली होती. बुधवारी रात्री शोभना आपल्या प्रियकरासोबत वेबकॅमेर्‍याच्या माध्यमातून चॅटिंग करत होती. काही वेळाने लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली.

बाचाबाचीचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात झालं. शोभनानं रागाच्या भरात आत्महत्या करण्याची धमकी दिली. काही वेळातच तिने फॅनला ओढणी लावून गळफास घेतला. यावेळी तिच्या प्रियकराने शोभनाच्या बहिणीला फोन करून घडत असलेला प्रकार सांगितला केलं. तिची बहिणी शोभनाच्या रूमपर्यंत पोहचेपर्यंत शोभनाने गळफास लावून घेतला होता.

तिला तातडीने नजीकच्या रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. दरम्यान, पोलिसांनी तरूणीचे शव शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आले आहे. तिने आत्महत्या का केली याचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2013 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close