S M L

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून जाळण्याचा प्रयत्न

नागपूर 24 मे : इथं मनिषनगर परिसरात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत सकाळी एक मुलगी जळालेल्या अवस्थेत सापडली होती. याच ठिकाणी सिगारेटची पाकिटे, दारूच्या बाटल्या आणि धारदार चाकू सापडला. त्यामुळे या मुलीवर बलात्कार करून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही मुलगी 90 टक्के भाजली असून तिच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.मुलीची प्रकृती चिंताजनक असून ती 80 टक्के जळाली असल्याचं समजतयं. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2013 10:01 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2013 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close