S M L

फिक्सिंग विरोधी नवा कायदा 'मोक्का'च्या धरतीवर ?

नवी दिल्ली 24 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटक्षेत्र हादरलंय. फिक्सिंगला आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकार फिक्सिंग विरोधात कायदा करण्याचा विचार करतंय. या नव्या विधेयकात फिक्सिंग अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याचा विचार केला जात आहे. तसंच 5 लाखांचा दंड आणि हा प्रस्तावित कायदा मोक्काप्रमाणे कडक करण्याची सरकारची इच्छा आहे. पैशांच्या व्यवहारावर प्रस्तावित कायद्यात मनी लाँड्रींग ऍक्टच्या काही तरतुदी समाविष्ट करण्यात येतील. आणि मनी लाँड्रींग ऍक्टनुसार दोषींना 3 ते 7 वर्षांचा सश्रम कारावास आणि 5 लाखांपर्यंतचा दंड ठोठवला जाऊ शकतो. तर पुरावे आणि निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर असणार आहे. दरम्यान, आयपीएलचे कमिशनर राजीव शुक्ला आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली यांनी आज केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांची भेट घेतली. स्पॉट फिक्सिंगप्रकरणांना आळा घालण्याासाठी कडक कायद्याच्या मागणीसाठी ही भेट घेण्यात आल्याचं राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे. फिक्सिंग विरोधी कायदा?- विधेयकात फिक्सिंग अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याचा विचार- 5 लाख रुपयांचा दंड आकारण्याचा विचार- हा प्रस्तावित कायदा मोक्काप्रमाणे कडक करण्याची सरकारची इच्छा- पुरावे आणि निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर- या प्रस्तावित कायद्यात मनी लाँड्रींग ऍक्टच्या काही तरतुदी समाविष्ट करण्यात येतील- मनी लाँड्रींग ऍक्टनुसार दोषींना 3 ते 7 वर्षांचा सश्रम कारावास आणि 5 लाखांपर्यंतचा दंड ठोठवला जाऊ शकतो

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2013 11:47 AM IST

फिक्सिंग विरोधी नवा कायदा 'मोक्का'च्या धरतीवर ?

नवी दिल्ली 24 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटक्षेत्र हादरलंय. फिक्सिंगला आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकार फिक्सिंग विरोधात कायदा करण्याचा विचार करतंय. या नव्या विधेयकात फिक्सिंग अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याचा विचार केला जात आहे. तसंच 5 लाखांचा दंड आणि हा प्रस्तावित कायदा मोक्काप्रमाणे कडक करण्याची सरकारची इच्छा आहे.

पैशांच्या व्यवहारावर प्रस्तावित कायद्यात मनी लाँड्रींग ऍक्टच्या काही तरतुदी समाविष्ट करण्यात येतील. आणि मनी लाँड्रींग ऍक्टनुसार दोषींना 3 ते 7 वर्षांचा सश्रम कारावास आणि 5 लाखांपर्यंतचा दंड ठोठवला जाऊ शकतो. तर पुरावे आणि निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर असणार आहे.

दरम्यान, आयपीएलचे कमिशनर राजीव शुक्ला आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली यांनी आज केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांची भेट घेतली. स्पॉट फिक्सिंगप्रकरणांना आळा घालण्याासाठी कडक कायद्याच्या मागणीसाठी ही भेट घेण्यात आल्याचं राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे. फिक्सिंग विरोधी कायदा?

- विधेयकात फिक्सिंग अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याचा विचार- 5 लाख रुपयांचा दंड आकारण्याचा विचार- हा प्रस्तावित कायदा मोक्काप्रमाणे कडक करण्याची सरकारची इच्छा- पुरावे आणि निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर- या प्रस्तावित कायद्यात मनी लाँड्रींग ऍक्टच्या काही तरतुदी समाविष्ट करण्यात येतील- मनी लाँड्रींग ऍक्टनुसार दोषींना 3 ते 7 वर्षांचा सश्रम कारावास आणि 5 लाखांपर्यंतचा दंड ठोठवला जाऊ शकतो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2013 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close